---Advertisement---

४४ वर्षांनी केला खुलासा, म्हणून गावसकरांनी मुलाचे नाव ठेवले होते रोहन

On: सोमवार, जून 8, 2020 9:09 PM
---Advertisement---

मुंबई । मूळचे भारतीय वंशाचे असलेले पण वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून खेळणारे रोहन कन्हाय यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. आपल्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत  त्यांनी फलंदाज म्हणून चांगला दबदबा निर्माण केला होता. क्रिकेट कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 6 हजार 227 धावा करत 15 शतके, 28 अर्धशतके केली. त्यांच्या बहारदार कामगिरीमुळेच ते अनेक खेळाडूंचे प्रेरणास्थान ही बनले. 

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे देखील रोहन कन्हाय यांचे जबरदस्त फॅन होते. यासोबत रोहन कन्हाय यांना ते प्रेरणास्थान मानत. रोहन यांच्या फलंदाजी पासून प्रेरित झालेल्या गावसकरांनी आपल्या मुलाला नाव त्यांचे नाव दिले. एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्करांनी आपल्या मुलाला रोहन यांचे नाव का दिले? याचा 44 वर्षांनंतर खुलासा केला. गावस्करांच्या मते, रोहन यांनीच वेस्टइंडीजच्या धर्तीवर दमदार कामगिरी करण्यास त्यांनीच प्रेरित केले होते.

गावसकर म्हणाले की,  “जेव्हा मी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरायचे तेव्हा रोहन माझ्या कानाजवळ येऊन मला शतक करण्यासाठी प्रोत्साहित करायचे.”

1971 साली भारताच्या वेस्टइंडीज दौऱ्याची आठवण सांगताना ते म्हणाले,  “कसोटी मालिकेतील एका सामन्यात मी खराब फटका मारला. त्यावेळी गोलंदाजाने षटक पूर्ण केल्यानंतर स्लिप कडे जात असताना रोहन माझ्या कानाजवळ म्हणाला, तुला शतक करायचे नाही का? खेळावर लक्ष केंद्रीत कर. नेमकी अडचण काय आहे? त्यांना मला शतक करताना पाहायचे होते. रोहन विरोधी संघात असले तरी त्यांनी कधी कुणाची खिल्ली उडवली नाही. या मालिकेत मी तीन शतक आणि एक द्विशतक ठोकले.”

रोहन गावसकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1976 साली कानपूर येथे झाला. त्याने भारताकडून 11 वनडे सामने खेळत 151 धावा केल्या. त्यात एक बळीदेखील घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---