भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी इतर देशांतील क्रिकेटतज्ज्ञांवर निशाणा साधला आहे. गावसकर म्हणाले की, इतर देशांतील माजी क्रिकेटपटू येथे येतात आणि आमचा संघ निवडतात. आम्हाला तिथे जाऊन त्यांचा संघ निवडण्याची अजिबात परवानगी नाही.
अनेकदा इतर देशांतील क्रिकेटतज्ज्ञ भारतीय संघाबाबत खूप रस घेतात. मॅथ्यू हेडन, स्कॉट स्टायरिस, ब्रेट ली, टॉम मूडी आणि शोएब अख्तर यांसारखे दिग्गज भारतीय संघावर सतत चर्चा करताना दिसतात. त्यांना अनेकदा भारताचा संघ आणि प्लेइंग इलेव्हनबद्दल प्रश्न विचारले जातात आणि ते आपले मत देतात.
इतर देशांतील क्रिकेट समीक्षक भारताबाबत वक्तव्य करतात, ही गोष्ट गावसकर यांना पसंत नाही. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना म्हणाले,
“आपली माध्यमे स्वतःहून विदेशी खेळाडूंकडून येणाऱ्या विधानांना महत्त्व देतात. पाकिस्तानचे खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय संघाची निवड करतात. भारतीय संघ त्यांच्यासाठी चिंतेचा विषय कसा बनला आहे? कोणी भारतीय जाऊन ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानचा संघ निवडतो का? केवळ आपणच त्यांना तसे करू देतो. बाबर आझम हा विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापेक्षा सरस असल्याचे नेहमीच बोलले जाते.”
सध्या आशिया चषक स्पर्धा होत असताना अनेक विदेशी माजी खेळाडूंनी भारतीय संघाबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या. भारतीय संघात कोणते खेळाडू असावेत इथपासून प्लेईंग इलेव्हनमध्ये भारतीय संघाने काय चूक केली इतपत ते बोलत असतात. अनेक भारतीय प्रसारमाध्यमांच्या शोमध्ये या खेळाडूंना आमंत्रित करण्यात येते.
(Sunil Gavaskar Slams Indian Media Said You Give Importence Them)
हेही वाचाच-
‘नजम सेठी कुठला माल फुकत…’, भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या माजी पीसीबी अध्यक्षावर कडाडला ‘भज्जी’
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत ब्रेकिंग! आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय, लगेच वाचा