fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘या’ संघाने केले होते विराटचे कारकिर्दीतील सर्वात मोठे स्वप्न भंग

मुंबई | आयपीएलची सुरुवात होऊन आता १२ वर्ष झाली परंतु एकदाही आरसीबी म्हणजे बेंगळूर रॉयल चॅलेंजर्स संघाला हा या स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. ख्रिस गेल, एबी डी व्हिलियर्स, केविन पीटरसन सारखे स्फोटक फलंदाज असून संघाला हा किताब जिंकता आला नाही.

२०१६ साली आयपीएलचा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात झाला. हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय केला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३८ चेंडूत ६८ धावांची स्फोटक खेळी केली याला युवराज सिंगने चांगली साथ देत ३८ आणि बेट कटिंगने ३९ धावांची खेळी केली.

२०९ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघाने दमदार सुरुवात केली. ख्रिस गेल ३८ चेंडूत ७६ धावा ठोकल्या. तर विराट कोहलीने ३५ चेंडूत ५४ धावा केल्या . दोघांनी मिळून ११४धावांची भागीदारी रचली. गेल आणि विराट बाद होताच आरसीबीचा संघ पत्त्यासारखा कोसळला आणि शेवटी २०० धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादने आठ धावांनी विजय मिळवत आयपीएलचा किताब जिंकला.

सनराइज हैदराबादने सलग प्लेऑफचे तीन सामने जिंकून हे टायटल आपल्या नावे केले होते. एलिमेंटर राऊंडमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि दुसऱया क्वॉलिफायर सामन्यात गुजरात लायन्सचा पराभव केला.

सनराइज हैदराबादच्या गोलंदाजांनी या स्पर्धेत धारदार गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने २३ गडी बाद केले. अंतिम सामन्यात मात्र त्याला एकही गडी घेता बाद करता आला नाही. त्याने चार षटकांत पंचवीस धावा दिल्या. बेन कटिंगने २५ धावा देत दोन गडी बाद केले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवात आले.

You might also like