दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू आणि आयपीएलमधील सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार ऍडेन मार्करम शनिवारी (22 जुलै) लग्नबंधनात अडकला. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियामध्ये हा विवाह सोहळा पार पडला. मार्करमने त्याची गर्लफ्रेंड निकोला हिच्यासोबत लग्न केले आहे. मार्करम आणि निकोला हे एकमेकांना 2012 पासून डेट करत होते तब्बल 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी शनिवारी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली.
ऍडेन मार्करम (Aiden Markram) आणि निकोला हे आपल्या शालेय जिवन पासून एकत्र आहेत. बारा वर्षाच्या प्रेम संबंधातून 25 जून 2022ला मार्करम आणि निकोलाने साखरपूडा केला होता. त्यानंतर वर्षभराने हे दोघे लग्नबंधनात अडकले. विवाहासाठी दोघांच्या घरचे आणि मोजकेच मित्र मंडळी जमली होती. निकोला ही दिसायला सुंदर असून ती एक उद्योजक आहे.
निकोलाची “नादौरा” नावाची एक ज्वेलरी कंपनी आहे. निकोला दिसायला सुंदर असल्याने ती वेळप्रसंगी कंपनीसाठी मॉडलिंग देखील करते. या कामासोबतच ती वाईन टेस्टिंगच काम देखिल करते. ती जगभरात फिरुन वेगवेगळ्या वाईनचा स्वाद घेत असते. निकोला आपल्या कामासोबतच समाजसेवेतही पुढे आहे. ती “अब्बा हाऊस” या अनाथ मुलांच्या संस्थेसाठी सतत कार्यरत असते. ती अनाथ मुलांच्या सांभाळासाठी सतत आर्थिक मदत करत असते. निकोला यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मर्करमच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद संघाला चेअर करण्यासाठी आली होती.
ऍडेन मार्करम हा दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू असून तो आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो. मार्करामने देशासाठी आत्तापर्यंत 35 कसोटी सामने खेळून 6 शतके आणि 10 अर्धशतकाच्या मदतीने 2285 धावा केल्या आहेत. तर 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1440 धावा केल्या आहेत. मार्करमच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 34 सामन्यांमध्ये 9 अर्धशतकांसह 966 धावा केल्या आहेत.
आणखी वाचा:
पाकिस्तानविरुद्धच्या फायनलची नाणेफेक भारताच्या पारड्यात! टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार