---Advertisement---

मेगा लिलावापूर्वी हैदराबादचा प्लॅन ठरला, 150चा स्पीड असणाऱ्या वेगवान गोलंदाजाला बसणार मोठा झटका!

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. लिलावाला अजून काही महिने बाकी असले तरी वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सनरायझर्स हैदराबाद लवकरच भारतीय वेगवान गोलंदाजाला संघातून बाहेर करणार आहे. उमरान मलिक असं या वेगवान गोलंदाजाचं नाव असून तो आयपीएल 2022 मध्ये ताशी 150 किमीपेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकल्यामुळे प्रसिद्धीझोतात आला होता.

न्यूज 24 च्या वृत्तानुसार, उमरान मलिकला आयपीएल 2025 पूर्वी रिलीज केलं जाऊ शकतं. अनेक फ्रँचाईझींना उमरानचा त्यांच्या संघात समावेश करायचा आहे, असंही अहवालात सांगण्यात आलंय. सनरायझर्स हैदराबादनं 2021 मध्ये उमरान मलिकला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीला विकत घेतलं होतं. परंतु पुढच्या वर्षी, हैदराबादनं त्याच्यावर 4 कोटी रुपयांची बोली लावली आणि 2023 मध्येही त्याला तेवढाच पगार मिळाला.

उमरान मलिक आयपीएल 2024 मध्ये फक्त एकच सामना खेळू शकला, ज्यामध्ये त्यानं फक्त एकच षटक टाकलं. त्याच्यावर खराब इकॉनॉमी रेट आणि खराब लाईन-लेन्थ मुळे सतत टीका होत आहे. म्हणूनच कदाचित हैदराबादचा संघ त्याच्या जागी नवीन गोलंदाजाच्या शोधत आहे. उमरानला रिलिज केल्यानं सनरायझर्स हैदराबादच्या पर्समध्ये 4 कोटी रुपयांची भर पडेल हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे. यामुळे हैदराबाद फ्रँचायझीला आयपीएल 2025 मध्ये एक मजबूत संघ उभा करण्यात मदत होईल.

उमरान मलिकनं 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, जिथे त्यानं 3 सामन्यात फक्त 2 विकेट घेतल्या. त्याचा सर्वात शानदार हंगाम 2022 मध्ये आला, जिथे त्यानं 14 सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या. पण 2023 मध्ये त्याला खराब इकॉनॉमी रेट आणि वाईट लाईन-लेन्थमुळे ट्रोल व्हावं लागलं. त्यानं आयपीएल 2023 मध्ये 8 सामन्यांत फक्त 5 विकेट घेतल्या आणि 10.85 च्या इकॉनॉमी रेटनं धावा दिल्या. उमराननं आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 26 सामन्यांत 29 विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने
श्रीलंकेचे 3 खेळाडू, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, स्टार खेळाडूचं दोन वर्षांनंतर पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---