---Advertisement---

रेड्डीने पॉईंटवर पकडलेल्या ‘या’ झेलाने आली युवीची आठवण! रोहितही झाला स्तब्ध, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

आयपीएल 2023चा 69 वा सामना रविवारी (21 मे) खेळला गेला. मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने आठ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने शानदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली. मात्र, त्याचवेळी त्याला बाद करताना हैदराबादचा युवा खेळाडू नितिश रेड्डी याने एक अविस्मरणीय झेल टिपला. त्यामुळे अनेकांना भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची आठवण झाली.

प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याचे आव्हान असताना मुंबईने 201 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. ईशान किशन वेगवान सुरुवात दिल्यानंतर बाद झाला. मात्र, रोहित शर्माने संघाची जबाबदारी खांद्यावर घेताना दमदार फलंदाजी सुरू ठेवली. त्याने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानचा फायदा घेत अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 37 चेंडूवर 56 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

 

रोहित चौदाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. मयंक डागर टाकत असलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या नितिश रेड्डी याने पूर्णपणे हवेत झेपावत उजव्या बाजूला एक अप्रतिम झेल पूर्ण केला. स्वतः रोहितने देखील त्याच्या झेलाचे कौतुक केले.

सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, हा झेल पाहून युवराज सिंग याची आठवण झाली. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग अशा प्रकारे पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असताना असामान्य झेल टिपत असे. ‌‌ युवराज याला भारतीय क्रिकेटचे इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक समजले जाते.

(Sunrisers Hyderabad Nitish Reddy Complete Stunning Catch Of Rohit Sharma People Compared With Yuvraj Singh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर

हिरो हिटमॅन! धुवांधार अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, पुढे फक्त विराटच 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---