---Advertisement---

GT vs SRH: हैदराबादने गुजरातला जिंकण्यासाठी दिलं 153 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 19 वा सामना खेळला जात आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद दोन्ही संघात खेळला जात आहे. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर होत आहे. तसेच गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 152 धावा केल्या. आता गुजरातला जिंकण्यासाठी 153 धावांचं आव्हान दिलं आहे.

हैदराबादसाठी प्रथम फलंदाजी करताना कोणताही फलंदाज सर्वाधिक धावा करू शकला नाही. हैदराबादसाठी अभिषेक शर्माने 18 धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेड अवघ्या 8 धावांवर बाद झाला. तसेच ईशान किशन प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तो सुद्धा 17 धावांवर बाद झाला. तसेच बाकीच्या फलंदाजांमध्ये संघासाठी नितीश कुमार रेड्डीने 31 धावा, क्लासेन 27 धावा, कर्णधार पॅट कमिन्सने 22 धावा केल्या.

गुजरातसाठी सर्वोत्तम गोलंदाजी मोहम्मद सिराजने केली त्याने चार षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने मागच्या सामन्यात देखील तीन विकेट्स पटकावल्या होत्या. तसेच प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट्स घेतल्या. याचबरोबर साई किशोरने दोन विकेट्स पटकावल्या. या सामन्यात दरम्यान गुजरात संघाचा ग्लेन फिलिप्स दुखापती झाला आहे.

आता किती षटकात गुजरात हे आव्हान पूर्ण करेल हे पाहणं रंजकतेचे असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---