शनिवारी (दि. 29 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली येथे पार पडलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने शानदार विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीला 9 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह हैदराबादने हंगामातील तिसरा विजय मिळवला. यापूर्वीच्या सलग तिन्ही सामन्यात हैदराबादला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार एडेन मार्करम याने घेतलेला हा निर्णय हैदराबादच्या खेळाडूंना योग्य असल्याचे सिद्ध केले. यावेळी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 197 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला 6 विकेट्स गमावत 188 धावाच करता आल्या. अपयश आले. त्यामुळे हा सामना हैदराबादने 9 धावांनी जिंकला.
Match 40. Sunrisers Hyderabad Won by 9 Run(s) https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL #DCvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
दिल्लीचा पराभव
दिल्लीकडून फलंदाजी करताना मिचेल मार्श याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 63 धावा चोपल्या. यामध्ये 1 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त फिल सॉल्ट यानेही 59 धावांचे योगदान दिले. यावेळी अक्षर पटेल याने नाबाद 29 धावा केल्या. दिल्लीकडून पदार्पण करणाऱ्या प्रियम गर्ग याला 12 धावाच करता आल्या. तसेच, रिपल पटेल यानेही नाबाद 11 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना मयंक मार्कंडे याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 20 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, अकील होसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
अभिषेक शर्माची वादळी खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्मा याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने 36 चेंडूत 67 धावा चोपल्या. यामध्ये 1 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त हेन्रीच क्लासेन यानेही नाबाद 53 धावांचे योगदान दिले. तसेच, अब्दुल समद (28), अकील होसेन (16) आणि राहुल त्रिपाठी (10) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. हॅरी ब्रूक खाते न खोलताच तंबूत परतला.
यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल मार्श चमकला. त्याने सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 27 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ईशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या विजयासह हैदराबादने 6 गुण मिळवत एक स्थानाचा फायदा घेत आठव्या स्थानी उडी घेतली. (sunrisers hyderabad won by 9 runs against delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या 10 गोष्टी, एका क्लिकवर घ्या जाणून
Video: लाईव्ह सामन्यात गिल-राणामधील बाचाबाची चव्हाट्यावर, DRS ड्राम्यानंतरचा क्षण व्हिडिओत कैद