मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर झालेल्या आयपीएल २०२०च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला २० धावांनी नमवले. यासह चेन्नईने हंगामातील तिसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेची पायरी चढत सहावे स्थान गाठले. मात्र सामन्यादरम्यान हैदराबादच्या फिरकीपटू राशिद खानची चांगलीच फजिती झाली.
आपणा सर्वांना माहिती आहे की, क्रिकेटमध्ये त्रिफळाचीत, झेलबाद, यष्टीचीत, पायचीत, धावबाद आणि हिट विकेट असे बाद होण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा सामन्यापुर्वी नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आणि हैदराबादला १६७ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल १८व्या षटकापर्यंत हैदराबादचा स्कोर ६ बाद १२६ धावा इतका झाला. त्यानंतर ७व्या क्रमांकावर राशिद फलंदाजीसाठी आला. मात्र नेहमी गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांची बोलती बंद करणाऱ्या या गोलंदाजाने षटकांची मर्यादा ध्यान्यात घेऊन जोरदार षटकेबाजी केली.
पहिल्याच २ चेंडूत त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. पण पुढील काही चेंडूंवर त्याला १-२ धावांवर समाधान मानावे लागले. शेवटी त्याने शार्दुल ठाकूरच्या षटकातील सहाव्या चेंडूवर (१८.६) एमएस धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्या शॉटच्या धुंदीत राशिद क्रिजच्या जास्तच मागे सरकला आणि त्याचा पाय मागे यष्टीला लागला. तर दूसऱ्या बाजूला चेन्नईच्या दीपक चाहरने राशिदने मारलेला चेंडू झेलला.
परंतु आधीच राशिदचा पाय यष्टीला लागल्याने पंचाने त्याला हिट विकेट दिले होते. अशाप्रकारे राशिद एकाच चेंडूवर दोन वेळा (हिट विकेट आणि झेलबाद) बाद झाला.
https://twitter.com/ryandesa_07/status/1316082816782802945?s=20
यानंतर राशिदच्या या अनोख्या विकेटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.
महत्त्वाच्या बातम्या-
तो तर परिपूर्ण क्रिकेटपटू! धोनीने चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे केले कौतुक
मी जे बोलतो ते करुन दाखवतो! धोनीला सांगून आऊट करणारा ‘हा’ पहिलाच खेळाडू
यष्टीमागे फलंदाजांची दांडी उडवण्याची ‘त्याने’ केली सेंचूरी, धोनीवरही ठरला वरचढ
ट्रेंडिंग लेख-
असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस…
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार