मुंबई। गुरुवारी (१५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील ७ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाल. या सामन्यात राजस्थानने नाणफेक जिंकत राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा घेत राजस्थानकडून जयदेव उनाडकटने दिल्लीच्या ३ फलंदाजांच्या विकेट्स लवकर घेत चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एक अप्रतिम झेलही घेतला.
झाले असे की दिल्लीकडून सलामीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन उतरले. पण उनाडकटने शॉला दुसऱ्याच षटकात २ धावांवर बाद केले. त्यानंतर शिखर चांगला खेळेल असे वाटत असतानाच तोही उनाडकटच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक सॅमसनने घेतला.
उनाडकटने टाकलेल्या चेंडूवर शिखरने स्कुपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून उडाला. हा उडालेला चेंडू सॅमसनने उजव्या बाजूला उडी मारत झोकुन देत एका हाताने पकडला. त्याने घेतलेल्या या अफलातून झेलमुळे शिखरला ११ चेंडूत ९ धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागले. या झेलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Flying Samson @IamSanjuSamson, what a catch ???????????????? #DCvsRR #IPL2021 #DC #RRvsDC pic.twitter.com/AOIjSD4IAI
— Rohit (@RohitnVicky) April 15, 2021
என்ன catch டா #DCvsRR #SanjuSamson pic.twitter.com/NxNxqaI5gF
— Jerome (@jeromespeed) April 15, 2021
दिल्लीची खराब सुरुवात
दिल्लीच्या डावाची सुरुवात खराब झाली. उनाडकटने शॉ आणि शिखर यांना बाद केल्यानंतर ६ व्या षटकांत अजिंक्य रहाणेलाही बाद केले. रहाणे ८ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ मार्कस स्टॉयनिस हा मुस्तफिजूर रेहमानच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला.
पहिल्या सामन्यात उनाडकटला मिळाली नव्हती संधी
गुरुवारी राजस्थानला शानदार सुरुवात करुन देणाऱ्या उनाडकटला पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या या हंगामातील राजस्थानच्या पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती. मात्र, दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला श्रेयस गोपाळ ऐवजी राजस्थानच्या ११ जणांच्या संघामध्ये संधी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीत सामील होताच चमकलं ‘मॅक्स’भाऊचं नशीब; मागील ३ वर्षात न जमलेला पराक्रम अवघ्या २ सामन्यात केला
ताकद जगासमोर! विराटची दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी विस्डेनकडून निवड; सचिन, कपिल देव यांचाही गौरव