इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसरा सामना बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. तसेच चेन्नई संघाकडून फलंदाजी करताना सुरेश रैनाने जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने आयपीएलमधील मोठा विक्रम आपल्या नावावर करत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
गतवर्षी कोरोना असल्या कारणाने आयपीएल २०२० स्पर्धा उशिराने युएईमध्ये खेळवण्यात आली होती. या हंगामात सुरेश रैना याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. याचा फटका चेन्नई सुपर किंग्ज संघाला बसला होता. चेन्नईला आयपीएल २०२० स्पर्धेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत सुरेश रैना याने जोरदार पुनरागमन केले आहे.
आज (१० एप्रिल) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई संघाने सुरुवातीलाच सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यांनतर सुरेश रैनावर डाव सावरण्याची जबाबदारी आली होती. रैनाने मोईन अली सोबत महत्वाची भागीदारी केली होती. यासोबतच त्याने ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली होती. यात त्याने ३ चौकार आणि ४ षटकार लगावले होते.
अर्धशतक झळकावताच त्याने शिखर धवनला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बरोबरी केली आहे. सुरेश रैनाने या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील आपले ३९ वे अर्धशतक झळकावले आहे. विराट आणि रोहितच्या नावावरही आयपीएलमध्ये ३९ अर्धशतके आहेत.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक अर्धशतक झळकावणारे फलंदाज
शिखर धवन : ४१ अर्धशतक
सुरेश रैना : ३९ अर्धशतक
विराट कोहली : ३९ अर्धशतक
रोहित शर्मा :३९ अर्धशतक
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीच्या चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर ‘मोठा’ विक्रम
थाला-चिन्नाथाला जोडीचा मैदानावर उतरताच विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारी आयपीएलमधील एकमेव जोडी