fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर गेला तरी चेन्नई सुपर किंग्सवर परिणाम होणार नाही, पहा कोण म्हणतंय

September 1, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL


मुंबई । आयपीएल 2020 अद्याप सुरू झाले नाही, पण त्याआधी चेन्नई सुपरकिंग्जचा संघ चिंतेत पडला आहे. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड हे त्याचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि त्यानंतर संघातील वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला.

सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव आयपीएलचा हा हंगाम खेळणार नाही, पण आयपीएलमधून माघार घेण्याची काही वेगळी कारणे सांगितले जात आहे. तसे पाहता सुरेश रैना चेन्नई संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघातील संतुलनावर परिणाम होऊ शकतो. पण दोनवेळा कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल चॅम्पियन बनवणारा माजी कर्णधार गौतम गंभीरला तसे वाटत नाही. सुरेश रैनाच्या जाण्याने चेन्नई संघावर परिणाम होणार नाही, असा त्याचा विश्वास आहे.

सुरेश रैनाच्या अनुपस्थितीवर गौतम गंभीरने एक मोठे विधान केले की, धोनीच्या संघावर त्याचा परिणाम होणार नाही. स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रमात तो म्हणाला की, सुरेश रैनाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खूप धावा केल्या आहेत. तो चेन्नईकडून खेळला असो किंवा गुजरात लायन्सचा भाग असो, त्याने खोर्‍याने धावा केल्या. मात्र, त्याच्या जाण्याने चेन्नई संघाला फारसा त्रास होणार नाही. कारण चेन्नईत चांगले फलंदाज आहेत.

तो म्हणाला, “चेन्नई संघात अंबाती रायुडू आणि केदार जाधवसारखे फलंदाज आहेत. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरचे क्रिकेटपटू मोठ्या संख्येने आहेत.  स्वतः धोनीही त्या संघात आहे.  रैनाचे जाणे मोठे नुकसान आहे, परंतु आपण जितके विचार करतो तितके मोठे नुकसान नाही.”

तसेच गौतम गंभीरने धोनीला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्लाही दिला. धोनी बऱ्याचदा आयपीएलमध्ये पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला येतो.


Previous Post

बाळासाहेब ठाकरे ज्यांचा खेळ पहायला मैदानावर जात असे असा क्रिकेटर

Next Post

‘मिस्टर ३६०’ एबी डिलिवियर्सने केली आयपीएलच्या तयारीला सुरुवात; पहा व्हिडिओ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Next Post
Screengrab: Twitter/RCBTweets

'मिस्टर ३६०' एबी डिलिवियर्सने केली आयपीएलच्या तयारीला सुरुवात; पहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी 'या' ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी

Photo Courtesy: Twitter/ Lionsdenkxip

किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.