मुंबई । कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेटपटू पुढे येत आहेत. भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडू देखील आपल्यातील माणुसकी दाखवत भुकेल्या पोटांची भूक भागवत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसी या गरीबांचा अन्नदाता बनला आहे.
फाफ डू प्लेसी आणि त्याची पत्नी इमारी या दोघांनी मिळून त्यांच्या देशातील पस्तीस हजार मुलांना आत्तापर्यंत जेवण वाटले आहे. त्याच्या दानशूर वृत्तीचे जगभरातील क्रिकेटपटू कौतुक करत आहेत.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाचे प्रतिनिधीत्व खेळणाऱ्या फाफ डू प्लेसीचे त्याचा सहकारी मित्र सुरेश रैना ट्विटरवर कौतुक करताना लिहले की “फाफ आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. इमारी सोबत तू भुकेल्या मुलांना जेवण खाऊ घालत आहे. मी लोकांना विनंती करतो की मदतीसाठी पुढे यावे.”
Really proud of the work @faf1307 & Imari are doing to feed 35000 kids in South Africa who are struggling during #COVIDー19. I urge all of you to come forward & help in whatever capacity you can. Please donate here https://t.co/ifaniqxdJM pic.twitter.com/ypeelaLsyh
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 31, 2020
दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत 35 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 65 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाप डू प्लेसी हा चेन्नई सुपर किंग संघाचे प्रतिनिधित्व करतो जर कोरोना व्हायरसचे संकट नसले असते तर तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसला असता.