भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने त्याच्या कसोटी पदार्पणाविषयी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, युवराज सिंगने मला पदार्पणाच्या एक रात्र आधी येऊन सांगितले होते की, मी ठीक नाही त्यामुळे तू उद्या खेळण्यासाठी तयार रहा. रैनाने प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राशी बोलताना या गोष्टीचा उलगडा केला आहे. Suresh Raina Revealed Things About Test Debut And Yuvraj Singh
जुलै २०१०मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यातून रैनाने कसोटीत पदार्पण केले होते. याविषयी बोलताना रैना म्हणाला की, “त्या सामन्याच्या एक रात्र आधी युवी पाजीने मला बोलावले आणि म्हटले की, माझी तब्येत थोडी खराब आहे. त्यामुळे तूझ्याकडे आता चांगली संधी आहे. तू खेळ. कदाचित युवी पाजीला फूड इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचे पोट बिघडले होते. म्हणून तो खेळू शकला नाही. परंतु, उद्या खेळायचे याचा विचार करुन मला रात्रभर झोप आली नव्हती. मी खूप नर्वस झालो होतो.”
तरीही रैनाने त्याच्या कसोटी पदार्पणाची दमदार सुुरुवात केली होती. यावेळी युवराजची संघातील कमी भरुन काढत त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकले होते. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावा केल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, त्याचे पहिले कसोटी शतक पूर्ण करताना नॉन स्ट्रायकर बाजूला सचिन तेंडुलकर उभा होता. त्यामुळे हे शतक त्याच्यासाठी खूप विशेष ठरले.
रैनाने दमदार कसोटी पदार्पण केले होते. त्यामुळे त्याला आशा होती की, त्याची कसोटी कारकिर्द मोठी ठरेल. परंतु असे झाले नाही. त्याला केवळ १८ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने ७ अर्धशतके केली, शिवाय यात त्याच्या पहिल्या शतकाचाही समावेश होता. तरीही त्याला कसोटी संघातून काढून टाकण्यात आले.
जानेवारी २०१५ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रैनाने त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. नुकत्याच इरफान पठाणसोबत झालेल्या एका लाइव्ह चॅटमध्ये रैनाने त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाविषयीचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, “माझे पुनरागमनाचे प्रयत्न चालू आहेत. मी आयपीएलची देखील वाट पाहत आहे. परंतु आयपीएल आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. तो त्याच्या फिटनेसवरही लक्ष देत आहे.”
हे पाहणे रोमांचक ठरेल की, क्रिकेटची सुरुवात झाल्यानंतर रैनाला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते का नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
आता धोनीला भारतीय संघात पाठींबा देण्यासाठी ‘हा’ मोठा व्यक्ती मैदानात
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार…
. . . म्हणून क्रिकेटपटूंचे टेन्शन वाढणार, क्रिकेट खेळण्याआधी करावे लागणार हे काम