भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि माजी तुफानी फलंदाज सुरेश रैना यांनी गेली अनेक वर्ष सोबत क्रिकेट खेळले आहे. धोनीच्या सर्वात जवळचा कोणी मित्र असेल तर तो रैना असेल असे आपण म्हणू शकतो. कारण मैदानात आणि मैदानाच्या बाहेर आपण अनेकदा यांच्या मैत्रीच्या गोष्टी ऐकल्या आहेत. इतकेच नव्हे तर, २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दोघांनी सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. अशातच सुरेश रैनाने आपल्या आत्मचरित्रात ‘बिलिव्ह’ मध्ये धोनी बद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
रैनाने आपले आत्मचरित्र ‘बीलिव्ह’ मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. यात त्याने आयपीएल २००८ लिलावातील धोनीची मजेशीर गोष्ट देखील सांगितली आहे. यात त्याने लिहिले आहे की, “आयपीएलचा लिलाव होत होता, सर्वांना उत्सुकता होती की, मी कुठल्या संघात जाईल. जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघाने माझी निवड केली, तेव्हा मला आनंद झाला होता. कारण एमएस धोनी आणि मी एकाच संघात खेळणार होतो. माझी निवड झाल्यानंतर मी लगेचच मी धोनीला कॉल केला होता. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “नेहमीप्रमाणेच धोनीने फक्त तीन शब्द ‘मजा येईल बघ’ असे सांगत ते छोटे आणि सोपे ठेवले. गेली अनेक वर्षे आयपीएलमध्ये खेळून आमचे नाते अधिक मजबूत झाले आहेत. चेन्नई संघात मॅथ्यू हेडन, मुथय्या मुरलीधरन आणि स्टीफन फ्लेमिंगसारखे खेळाडू आहेत आणि मी या संघात आहे याचा विचार करून मला आनंद झाला होता.”
रैनाने गेली अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत एकूण ५४९१ धावा केल्या आहेत. यात ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाला २००८ साली ९१ लाखांची बोली लावत चेन्नई संघात स्थान देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ आहे एबीचे पुनरागमन न करण्याचे कारण, वाचून वाटेल अभिमान
“तेव्हाच मला संसर्ग झाल्याचे कळाले होते”, मायकेल हसीने शेअर केला कोरोनाचा अनुभव
भारत-न्यूझीलंड संघापैकी ‘हा’ संघ जिंकणार पहिली टेस्ट चॅम्पियनशीप, दिग्गजाची भविष्यवाणी