भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याने सहभाग घेतला होता, पण त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. अशातच त्याने काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्ससाठी खेळत आहे. बुधवारी (28 सप्टेंबर) रेट सेफ्टी लीगमध्ये ऑस्ट्रेलिया लिजेंड्ससोबत खेळताना त्याने एक नेत्रदीपक झेल घेतला.
इंडिया लिजेंड्स आणि ऑस्ट्रेलिया लिजेंड्स यांच्यात खेळला गेलेला हा उपांत्य सामना होता. मैदानात उपस्थित असताना सुरेश रैना (Suresh Raina ) पूर्ण उत्साहात दिसत होता. तो चेंडू त्याच्याकडे येण्याची वाटच हातत होता. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 16 व्या षटकात भारताचा अभिमन्यू मिथून गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याच्या एका फुल टॉस चेंडूवर बेन डंकने पॉइंट्सच्या दिशेने शॉट खेळला आणि त्याठिकाणी सुरेश रैना क्षेत्ररक्षणासाठी थांबला होता. चेंडू रैनापासून लांब होता, पण त्याने डाव्या बाजूला झेप मारत चेंडू झेलला. ऑस्ट्रेलियन फलंदाजाला तंबूत धाडल्यामुळे रैना खूपच खुश झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
🥵🫂 @ImRaina #Raina pic.twitter.com/fyBo9ckq33
— Dhruv Joshi (@dhruvjoshi___25) September 28, 2022
इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील त्यावेळा रैनाच्या जवळ आला आणि गळाभेट घेतली. रैनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सैना या व्हिडिओत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना दिसत असला, तरी त्याची फलंदाजी मात्र समाधानकारक राहिली नाहीये. उभय संघातील या उपांत्य सामन्याचा विचार केला, तर पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाने 17 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 136 धावा केल्या आहेत. गुरुवात म्हणजेच 29 सप्टेंबर दुपारी 3.30 मिनिटांनी राहिलेला सामना पुन्हा सुरू होईल.
भारतीय संघासाठी अभिमन्यू मिथून आणि यूसुफ पठाण यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच राहुल शर्माच्या नावावर एका विकेटची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियासाठी कॅमरून व्हाईट 6 आणि ब्रॅड हेडिन 1 धाव करून खेळपट्टीवर कायम आहेत. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितच! धोनीला टाकले मागे, वाचा सविस्तर
सूर्याचा प्रकाश लख्ख पडतोय! एकाच खेळीत रचले अनेक विश्वविक्रम
टी20 सामना अश्विनने बनविला कसोटी! केली अशी झकास गोलंदाजी