अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सोमवारी (१९ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात झालेला सामना एमएस धोनीसाठी खूप विशेष होता. कारण हा अटीतटीचा सामना धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. आयपीएलमध्ये हा मोठा विक्रम केल्यामुळे ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रैनाने धोनीसोबतचा चेन्नईच्या जर्सीतील एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, “आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू. आजच्या खास दिनी तुला घवघवीत यश लाभो.”
आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमात रैना अव्वल स्थानावर होता. मात्र यावर्षी तो आयपीएलमध्ये खेळत नसल्यामुळे त्याचा हा विक्रम मोडला आहे. २००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या धोनीने आतापर्यंत सातत्याने सामने खेळत रैनाचा हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्याने चेन्नईकडून आतापर्यंत १७० सामने आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून ३० सामने, असे मिळून एकूण २०० सामने पूर्ण केले आहेत. दरम्यान त्याने २३ अर्धशतकांच्या मदतीने ४५६८ धावा केल्या आहेत.
The first ever player to play his 200th match in IPL, Best of luck for today @msdhoni Bhai .. Wishing you loads of success. You always make us proud ????. #yellove????#chennaisuperkings #whistlepodu pic.twitter.com/ORm8jP9X53
— Suresh Raina???????? (@ImRaina) October 19, 2020
धोनीव्यतिरिक्त या विक्रमाच्या यादीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दूसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १९७ सामने खेळले आहेत. तर सुरेश रैना १९३ सामने, दिनेश कार्तिक १९१ सामने आणि विराट कोहली १८६ सामन्यांसह या यादीत टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ रांगतही नव्हता तेव्हा वाॅटसनने सुरू केलेलं क्रिकेट, आज त्यानेच केली ‘दांडी गुल’
धोनी रिव्ह्यू सिस्टिम पुन्हा ऍक्टिवेट- पाहा कशी वाचवली अंबाती रायडूची विकेट
धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’