माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या काकाच्या (आत्याचे पती) हत्येमध्ये सहभागी आरोपी छज्जू उर्फ छैमार याला रविवारी (१८ जुलै) उत्तर प्रदेशच्या बरेलीतील बलेरी येथून अटक करण्यात आली आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या गावी पाचपेडामध्ये लपून बसला होता. मात्र पोलिसांना त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक करून पठाणकोट येथे नेले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक एसटीएफ सत्यसेन यादव यांनी म्हटले की, “एसटीएफ फिल्ड युनिट बरेलीचे निरीक्षक अजयपाल सिंग यांच्या नेतृत्वात असलेल्या पथकाला माहीती मिळाली होती की, प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या नातेवाईकांच्या घरात घुसलेला छज्जू उर्फ छैमार हा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पाचपेडा या गावात लपला आहे.” ही माहिती त्यांनी पंजाब पोलिसांना सांगत त्यांना त्या स्थानी बोलावून घेतले होते.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात टाकला होता दरोडा
रविवारी (१८ जुलै) एसटीएफ बरेली आणि पंजाब पोलिसांनी स्थानिक पोलिसांसह छज्जू उर्फ छैमार याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली आहे. छैमारने आपल्या टोळीतील साथीदारांसह सुरेश रैनाचे काका अशोक कुमार यांच्या घरात दरोडा टाकला होता. या दरम्यान अशोक यांची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैनाचे काका अशोक कुमार पठाणकोट पंजाबमध्ये राहत होते. ते ठेकेदार होते.(Suresh raina uncle killer arrested from Bareilly)
त्यांनी वस्तीपासून दूर असलेल्या फरियालमध्ये आपले घर बांधले होते. आधी त्या दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा शोध घेतला होता. त्यानंतर १९-२० ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी त्यांच्या घरावर चढून झोपेत असलेल्या लोकांना दांड्याने मारहाण केली होती. या दरम्यान अशोक कुमार यांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांची आई सत्यदेवी, पत्नी आशा देवी आणि दोन मुले या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात शाहपुर पौरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
After 11 months, key accused involved in the killing of former India cricketer Suresh Raina's uncle arrested.
Arrested by the UP STF from Bareilly, the accused & his partners, including 3 women, had carried out a dacoity at Mr. Ashok Kumar's (Raina's uncle) home in #Pathankot. pic.twitter.com/RchcIOWFRH
— Kishor Dwivedi (@Kishor__Dwivedi) July 18, 2021
हल्ला करण्यात महिलांचा ही समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छज्जू उर्फ छैमारने विचारपूस करत असताना सांगितले की, तो आपला सहकारी शाहरुख, मोहब्बत, राशिद आमिर आणि तीन महिंलासह शाहपुर कौडी पंजाबमध्ये राहून चादर आणि फुले विकायचा. या महिला फुलं विकण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात गेल्या होत्या आणि संपूर्ण माहिती गोळा केली होती. त्यानंतर यांच्या समूहाने त्यांच्या घरावर दरोडा टाकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
दोन वर्षांपुर्वी चहलने एका वनडेत घेतल्या होत्या ६ विकेट्स, आज पुन्हा ही कामगिरी करत बनणार ‘शतकवीर’!
‘अनेकांना निवृत्तीनंतर महान खेळाडूची उपाधी मिळते, पण विराट ३०व्या वर्षीच लिजेंड बनलाय’