नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याच्या शांत आणि स्थिर स्वभावामुळेच त्याला ‘कॅप्टन कूल’ असे म्हटले जाते. कोणतीही परिस्थिती असो धोनी कधीही आपले संतुलन गमावत नाही. परंतु कधी कधी त्याला रागावताना पाहण्यात आले आहे. आता अशाच एका घटनेचा उल्लेख करत भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने सांगितले आहे की, धोनी कशाप्रकारे आपल्या घनिष्ठ मित्र सुरेश रैनावर रागावला होता.
आरपीने क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोणत्या दौऱ्यातील ही घटना होती. त्याने सांगितले, “भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता आणि यादरम्यानच धोनी रैनावर रागावला होता.”
त्याने पुढे सांगितले की, “भारतीय संघ श्रीलंकेत होता आणि एका सामन्यादरम्यान रैना कव्हर्सवर क्षेत्ररक्षण करत होता. परंतु तो वारंवार पुढे जात होता. त्यानंतर धोनीने त्याला चेतावणी दिली की त्याने पुढे जाऊ नये. रैना काही वेळासाठी व्यवस्थित राहिला. परंतु तो कदाचित धोनीची चेतावणी विसरला आणि पुन्हा पुढे आला त्यामुळे त्याच्याकडून एक चेंडू सुटला. त्यानंतर धोनीने रैनाला रागात म्हटले की पुन्हा आपल्या जागेवर जा.”
“तो रागवायचाही आणि कठोरही होता. तो खूप बोलत नव्हता परंतु राग त्यालाही येत होता,” असेही तो पुढे म्हणाला.
आरपीनेही आपल्या कारकिर्दीतील अनेक सामने धोनीच्या नेतृत्वात खेळले होते. त्याने सांगितले की, “देवधर ट्रॉफीदरम्यान त्याची धोनीसोबत पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हापासूनच त्याने आपले नाव बनवायला सुरुवात केली होती. यानंतर बेंगळुरू येथे एका शिबिरादरम्यान एकदा भेटलो होता. परंतु मी त्याला आधीपासूनच ओळखत होतो. त्यानंतर आम्ही ग्वाल्हेरमध्ये भेटलो, तेव्हा धोनी आधीपासूनच एक मोठा खेळाडू होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता
-इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?
-विराटच्या आरसीबीसेनेचा प्लॅन तयार; ‘या’ दिवशी होणार यूएईला रवाना
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलचे ५ परदेशी स्टार क्रिकेटर, जे सध्या खेळत आहेत कॅरेबियन प्रीमियर लीग
-देशाकडून एकही सामना न खेळण्याची संधी मिळालेले ५ महान क्रिकेटर
-५ क्रिकेटर ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पुन्हा केले होते कमबॅक, परंतू झाले सुपर फ्लॉप