Suryakumar Yadav Insta Story: दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे सुरू आहे. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजांपुढे जास्त काळ टीकू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 55 धावांत गारद झाला. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. सिराजची ही घातक गोलंदाजी पाहून सूर्यकुमार यादव हाही त्याचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad siraj) याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि 15 धावांत सहा विकेट्स घेतल्या. त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने इन्स्टावर दोन स्टोऱ्या शेअर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीत त्याने सिराजच्या विकेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट केला, तर दुसऱ्या स्टोरीत त्याने त्याचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘खेल गया’.
विशेष म्हणजे प्रोटीज संघाचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा पार करण्यात यशस्वी ठरले. दक्षिण आफ्रिकेची कसोटी फॉर्मेटमध्ये भारताविरुद्धची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या मैदानावर 55 किंवा त्यापेक्षा कमी धावा करून संघ आऊट होण्याची ही सातवी वेळ आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात 153 धावा करून सर्वबाद झाला.
दुसरीकडे, जर आपण सूर्यकुमार यादवबद्दल बोललो तर तो या मालिकेचा भाग नाही. मात्र, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 3-1 अशी मालिका जिंकली. सूर्या सध्या सुट्टीवर असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. (IND vs SA Suryakumar overjoyed to see Mohammed Siraj’s dangerous bowling shares story on Insta)
हेही वाचा
ICCने केली ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’साठी खेळाडूंची घोषणा, भारताच्या ‘या’ स्फोटक सलामीवीराचाही समावेश
AUS vs PAK: कारकीर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात David Warner मित्र Philip Hughesच्या आठवणीत झाला भावूक