भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून (४ ऑगस्ट) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बुधवार रोजी (०४ ऑगस्ट) सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सुखरूप इंग्लंडला पोहोचले आहेत. याची माहिती पृथ्वी शॉने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत दिली आहे.
जाणून घ्या हे दोघे आता किती दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील आणि केव्हापासून सुरू सराव सुरू करतील? (Suryakumar yadav and Prithvi shaw quarantine in England ahead india vs england)
सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे दोघेही नुकतेच श्रीलंका संघाविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळून आले आहेत. त्यांना वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि आवेश खान यांच्याऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच भारत विरुद्ध सिलेक्ट काउंटी इलेव्हन या संघांमध्ये सराव सामना खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान वॉशिग्टंन सुंदर आणि आवेश खानला देखील गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे दोघांनाही संघाबाहेर व्हावे लागले आहे.
https://www.instagram.com/p/CSHV2XEIgwM/?utm_medium=copy_link
आता पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव श्रीलंकेहून इंग्लंडला पोहोचले आहेत. परंतु त्यांना पुढील १० दिवस विलगिकरणात राहावे लागणार आहे. त्यांना १ ऑगस्टला इंग्लंडला पोहोचायचे होते. परंतु व्हीजा मिळत नसल्यामुळे त्यांना उशीर झाला होता. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते भारतीय संघासोबत सराव करण्यासाठी जोडले जाणार आहेत. या दरम्यान त्यांच्या काही कोरोना चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निवडीसाठी हे खेळाडू उपलब्ध असतील.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvIND: अष्टपैलू २ तर वेगवान गोलंदाज ४, टीम इंडियाविरुद्ध ‘असा’ असेल जो रूटचा संघ
“चेतेश्वर पुजारा एक निमित्त आहे, खरे लक्ष्य तर अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढण्याचे आहे”
‘पुजारावर विश्वास नसेल, तर सरळ त्याला बाहेर करा आणि दुसऱ्याला संधी द्या’