Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलसारखी खेळी

सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलसारखी खेळी

November 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
mohammad rizwan suryakumar yadav

Photo Courtesy: Twitter/TheRealPCB/BCCI


न्यूझीलंडविरुद्ध रविवारी (20 नोव्हेंबर) भारताने टी-20 मालिकेतील दुसरा सामना जिंकला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. रविवारी भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याने नाबाद 111 धावा कुटल्या. या वादळी खेळीच्या जोरावर सूर्याने भारताला विजय मिळवून दिलाच, पण पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याच्या खास विक्रमाच्या अगदी जवळ देखील पोहोचला.

मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याचा हा विक्रम म्हणजे एका वर्षात सर्वात जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा. या यादीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1151 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मोहम्मद रिझवान 1326 झावा करून यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी रिझवान याबाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. सूर्यकुमार यादव यावर्षी मोहम्मद रिझवानला पछाडण्यासाठी 175 धावांनी दूर आहे. पण अडचण 175 धावा नसून सामन्यांची आहे.

भारतीय संघाला मंगळवारी (22 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि वर्षातील शेवटचा टी-20 सामना खेळायचा आहे. अशात रिझवानचा हा विक्रम मोडण्यासाठी सूर्यकुमारला या सामन्यात 175 धावा कराव्या लागतील. टी-20 क्रिकेटमध्ये 175 धावा करणे कोणत्याही संघासाठी सोपी गोष्ट नाही, पण आयपीएल 2013 मध्ये ख्रिल गेल याने एकट्याने नाबाद 175 धावा कुटल्या होत्या. अशात सूर्यकुमारला जर रिझवानचा विक्रम मोडीत काढायचा असेल, तर त्याला देखील गेलसारखी 175 धावांची खेळी करावी लागेल.

सूर्यकुमारचे 2022 मध्ये भारतीय संघासाठी सर्वात किफायतशीर फलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या 30 टी-20 सामन्यांमध्ये 47.95 ची सरासरी आणि तब्बल 188.37 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. नुकताच पार पडलेला टी-20 विश्वचषक देखील सूर्यकुमारसाठी खास राहिला. न्यूझीलंडविरुद्ध रविवारी खेळताना त्याने अवग्या 32 चेंडूत अर्धसतक, तर 49 चेेंडूत शतक पूर्ण केले. नाबाद 111 धावा करण्यासाठी सूर्याने एकूण 51 चेंडू खेळले. यामध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. (Suryakumar Yadav can become the highest T20 run-scorer in 2022, but he will have to perform like Chris Gayle)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला…
हे पाच माजी क्रिकेटपटू निवडसमिती सदस्य होण्यासाठी इच्छुक; पश्चिम विभागातर्फे हे नावे आघाडीवर  


Next Post
Alex hales

ऍलेक्स हेल्सने सांगितले टी20मध्ये यशस्वी होण्याची रहस्य, भारताचे खेळाडू करु शकतील का 'या' गोष्टी?

Tim Southee praised suryakumar yadav

'या' गोष्टीमुळे आम्ही हारलो, साउदीने पराभवाची कारणे देत केले सूर्यकुमारवर वक्तव्य

FC Goa v ATK Mohun Bagan FC

एफसी गोवाने हिरो आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानला प्रथमच नमवले; चाहत्यांचे मन जिंकले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143