भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय संघाला श्रीलंकामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत या मर्यादित षटकांच्या मालिका होणार आहेत.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थिती श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी शिखर धवनला दिले आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवलाही स्थान मिळाले आहे. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर जाताना शिखर धवनने केलेल्या पोस्टवर सूर्यकुमार यादव त्याची मजा घेताना दिसून आला.
शिखर धवनने श्रीलंका दौऱ्यावर जात असतानाचा विमानातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये धवन सोबत पृथ्वी शॉ, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दिसून आले. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव देखील फोटोमध्ये दिसून आला. परंतु सूर्यकुमार यादव खूप लांब असलेला दिसत होता. धवन हा फोटो पोस्ट करत खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पुढचे स्टॉप श्रीलंका’.
https://www.instagram.com/p/CQp4c-arS7V/
शिखरने केलेल्या या पोस्टवर सूर्यकुमार यादवने मजेशीर पद्धतीने लिहिले की, ‘माझे लक्ष फक्त तुझ्याकडे होते, स्किपर. मला शोधा या फोटोमध्ये.’ सुर्यकुमारच्या या कमेंटला धवनने प्रत्युत्तर देत लिहिले की, ‘ हाहा, दिसला भाऊ पुढच्या वेळेस तुझ्याशिवाय फोटो नाही काढणार. त्या नजरेने मला खूप भीती वाटली.’
भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध जुलै महिन्यात सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा काहीदिवसांपूर्वीच करण्यात आली होती. तसेच श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने २ आठवडे मुंबई क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे.
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
असा असेल भारताचा श्रीलंका दौरा
वनडे मालिका –
१३ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो
१६ जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो
१८ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो
टी२० मालिका –
२१ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो
२३ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो
२५ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो
महत्त्वाच्या बातम्या –
विम्बल्डनला आली सचिन-विराटची आठवण, शेअर केला व्हिडिओ
भारीच! टीम इंडियाचा धुरंधर शुबमन गिलला WTC फायनलसाठी मिळाला खास सन्मान; आयसीसीने दिली माहिती
“आम्ही येथे जिंकण्यासाठी आलोय”, राहुल द्रविड यांनी फुंकले श्रीलंकेत पोहोचल्यावर रणशिंग