भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडूंना संघात पदार्पण करण्याची संधी मिळत आहे. त्यातच एका स्फोटक फलंदाजाने मोठा खुलासा केला आहे. त्या खेळाडूने रोहितचे त्याच्या कारकिर्दीत मोठे योगदान आहे, असे विधान केले आहे. तसेच सध्या हा खेळाडू भारतीय संघात सामनाविजयाची योग्य भुमिका पार पाडत आहे.
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आपल्या कारकिर्दीचे श्रेय रोहितला दिले आहे. “जेव्हा मी स्थानिक सामने खेळत होतो तेव्हा रोहितने माझा खेळ जवळून पाहिला आहे. त्यावर आम्ही चर्चा देखील करत होतो. आयपीएल २०१८-१९ हंगाम आला तेव्हा माझ्या खेळण्याच्या कौशल्यावर आम्ही खूप चर्चा देखील केली. यादरम्यान त्याने मला काही सुधारणाही सुचवल्या होत्या. सामन्यात कसा खेळ करायचा यावरून आमच्यात नेहमी संवाद व्हायचा. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. त्याने माझ्यावर खूप आत्मविश्वासही दाखवला आहे.”
“जेव्हा मी वाईट फॉर्ममधून जात होतो तेव्हा त्याने मला खूप मदत केली आहे. आयपीएलमध्ये माझ्याकडून धावा झाल्या नाही अशा परिस्थितीही त्याने माझ्यावर विश्वास दाखवला आहे.” यावर पुढे बोलताना तो म्हणाला, “आयपीएल २०२१च्या हंगामाच्या दुसऱ्या सत्रात मी खराब फॉर्ममधून जात होतो. तेव्हा रोहितने माझी साथ सोडली नाही. त्याने दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरत संघांना सामने जिंकून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”
सूर्यकुमार सध्या भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा नियमित खेळाडू बनला आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या तिन्ही वनडे सामन्यात खेळला आहे. तसेच त्याने आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या टी२० आणि वनडे मालिकांसाठी संघात घेतले गेले. तसेच त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यातही निवड करण्यात आली आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य असले तर त्याला आगामी टी२० विश्वचषकासाठीही भारतीय संघात जागा मिळू शकते.
सूर्यकुमार चौफेर शॉट्स मारत उत्तम फलंदाजी करण्यास प्रसिद्ध आहेत. त्याने २०१२मध्ये आयपीएल पदार्पण केले असता राष्ट्रीय संघात जागा मिळायला त्याला अधिक वेळ वाट पाहावी लागली. त्याने मार्च २०२१मध्ये त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यात टी२० सामन्यात शतकही झळकावले आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत ९ वनडे आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर टी२० मध्ये एक शतक आणि ४ अर्धशतके आहेत. तसेच वनडेमध्ये त्याने २ अर्धशतके कली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला मागे टाकून पुन्हा बाबरच बनला ‘आझम’
ENGvsIND : बुमराहची जागा घेणाऱ्या सिराजचा इंग्लंडला दणका, दोन धुरंधरांना शून्यावर धाडले तंबूत
तब्बल ९७ वर्षानंतर कसोटीमध्ये झाली पुनरावृत्ती, श्रीलंकेच्या गोलंदाजाचा धूमाकुळ कायम