Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्याच्या एका इशाऱ्याने ऍडलेडमध्ये घुमला ‘इंडिया..इंडिया..’ आवाज; पाहा जोशपूर्ण व्हिडिओ

November 2, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy; Twitter/Mumbai Indians

Photo Courtesy; Twitter/Mumbai Indians


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुपर 12 फेरीतील सामना खेळला गेला. अखेरच्य चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 5 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली. एकवेळ भारतीय संघ या सामन्यात मागे असताना भारताचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवने चाहत्यांना उत्साहित केल्यानंतर मैदानात भारतीय चाहत्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 184 धावा धावफलकावर लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पावसाने व्यत्यय आणेपर्यंत बांगलादेशने बिनबाद 66 धावा चोपलेल्या. पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेशला विजयासाठी 9 षटकात 85 धावांची गरज होती. पावसानंतर खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. त्यानंतर अर्शदीपने एकाच षटकात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन व अफीफ हुसेन यांना बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

 

अशावेळी भारतीय खेळाडूंना आणखी प्रोत्साहनाची गरज होती. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला सूर्यकुमार यादव याने आपल्या जर्सीवर लिहिलेल्या इंडिया नावाकडे इशारा करत भारतीय चाहत्यांना उत्साहित केले. त्यानंतर भारतीय चाहते मोठ्याने ‘इंडिया इंडिया’ असे ओरडताना दिसले. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार या विश्वचषकात भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध देखील त्याने केवळ 16 चेंडूंवर 30 धावा चोपलेल्या. टी20 विश्वचषकात सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे.

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे ‘मास्टर’, 2016मध्येही केलीय खास कामगिरी
बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानला दणका! वाचा नक्की कसे झाले नुकसान


Next Post
KL-Rahul-And-Virat-Kohli

विराटचे तोंड उघडवणारा राहुलचा षटकार पाहिला का? पाहून तुमच्याही बत्त्या होतील गुल

Virat-Kohli-And-Dinesh-Karthik

हाय प्रेशर सामन्यात सुटले कोहलीचे नियंत्रण, धावबाद झाल्यामुळे कार्तिक अन् विराटमध्ये बाचाबाची!

Mohammad Rizwan & Fakhar Zaman

पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, 'हा' स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143