एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी (१३ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडिन्सने १० धावांनी बाजी मारली. मुंबईच्या विजयात गोलंदाजांचा जसा महत्त्वाचा वाटा होता, तसाच झुंजार अर्धशतकी खेळी केलेल्या सुर्यकुमार यादवचाही होता.
त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तसेच त्याने त्याच्या खेळीदरम्यान मारलेला ९९ मीटरचा गगनचुंबी षटकार लक्षवेधी ठरला. आता सुर्यकुमारच्या आपल्या बहुचर्चित शॉटबद्दल मोठा खुलासा केला आहे.
आपला संघ सहाकारी आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या ट्रेडमार्क शॉटबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘तू हा शॉट कधी खेळायला सुरू केलास?’, असा प्रश्न विचारला असता सुर्यकुमार म्हणाला की, “बालपणी मी सिमेंटच्या ट्रॅकवर रबर बॉलने क्रिकेट खेळायचो. यावेळी आमची सीमारेषा जवळपास ९०-९५ मीटर दूर असायची. त्या वयातच मी हा शॉट खेळायला सुरू केला.”
पुढे आपल्या ९९ मीटरच्या षटकारासंबंधी बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “तो षटकार खरोखरच अनपेक्षित होता. मला जेव्हा कळाले की, तो चक्क ९९ मीटरचा षटकार होता. तेव्हा एकून मला खूप आनंद झाला. तो माझ्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत लांब षटकार होता. मला भविष्यात अशीच फटकेबाजी चालू ठेवायची आहे.”
Our SKY ???????? Touching the SKY @surya_14kumar talks about THAT 9⃣9⃣ metres six and an epic win! ????#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #KKRvMI pic.twitter.com/SRl8r6g5nR
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2021
सुर्यकुमारचा ९९ मीटरचा षटकार
मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माने सुरुवात केली होती. पण केवळ डी कॉक २ धावांवरच डावाच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे तिसऱ्याच षटकात सुर्यकुमार यादवला फलंदाजीला यावे लागले. सुर्यकुमार आणि रोहितने मुंबईचा डाव सावरताना ७६ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, सुर्यकुमारने अर्धशतकी खेळी केली.
त्याने त्याचे अर्धशतकही षटकार मारत पूर्ण केले. त्याने १० व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजी करत असताना हेलिकॉप्टर शॉट खेळत ९९ मीटरचा खणखणीत षटकार ठोकला. यासह त्याने ३३ चेंडूत त्याचे १२ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. त्याने मारलेला हा षटकार पाहून मुंबईच्या ड्रेसिंगरुममध्ये बसलेला हार्दिक पंड्याही आश्चर्यचकीत झाला आणि त्याने उभे राहुन सुर्यकुमारचे कौतुक केले.
मात्र, हे अर्धशतक पूर्ण करताच सूर्यकुमार ३६ चेंडूत ५६ धावांची खेळी करुन बाद झाला. या खेळीत त्याने एकूण ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या या अर्धशतकामुळे आणि रोहितने केलेल्या ४३ धावांच्या खेळीमुळे मुंबईला १५२ धावांचा टप्पा गाठता आला.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बाबा चेंडू बघून तरी थांबायचं! पाकिस्तानी खेळाडूने ‘असा’ सोडला सोपा झेल, Video पाहून व्हाल लोटपोट