मुंबई इंडियन्स संघाचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव सोमवारी (०९ मे) दुखापतीमुळे आयपीएल २०२२च्या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक धक्का आहे. तत्पूर्वी सूर्यकुमारने त्याच्या प्रशंसकांसाठी मनाला भावेल असे ट्वीट केले आहे.
सूर्यकुमारच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबई (Mumbai Indians) संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, “सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत करून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.”
https://www.instagram.com/p/CdVrEPkvHsa/?utm_source=ig_web_copy_link
अशात सूर्यकुमारची दुखापत बरी होण्यासाठी किती वेळ लागेल, हे अद्याप समजलेले नाही. अशात त्याने आपल्या प्रशंसकांना म्हटले आहे की, तुमच्या समर्थन आणि आशीर्वादाच्या बळावर मी लवकरच बरा होऊन परत येईल.
त्याने आपला एक फोटो पोस्ट करत ट्वीट केले आहे की, “यावेळी मी माझ्या मुंबई इंडियन्स कुटुंबाला दुसऱ्या बाजूने चीयर करत आहे. दमदार पुनरागमन करत उच्च स्तरावर आयपीएलच्या चालू हंगामाचा शेवट करू आणि आपले मैदानावरील खरे रूप सर्वांना दाखवून देऊ.”
With all your good wishes and support, I will be back in no time 😇
To my MI family, I will be cheering for you from the other side, this time. Let’s finish the tournament on a high note and display our true character on field. 💪 pic.twitter.com/WXfd2iwZIW
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) May 9, 2022
मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२मधील कामगिरी
पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसाठी हा हंगाम खूपच खराब गेला आहे. जबरदस्त खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना हा हंगाम गाजवता आलेला नाहीये. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत या हंगामातील ११ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी फक्त २ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना उर्वरित ९ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
सूर्यकुमार यादवची आयपीएल कारकीर्द
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत १२३ आयपीएल (IPL) सामने खेळले आहेत. त्यातील १०८ डावात फलंदाजी करताना त्याने ३०.०५च्या सरासरीने २६४४ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १६ अर्धशतकेही झळकावली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यावर येणार ऑस्ट्रेलिया, खेळणार टी२० मालिका; पाहा कधी होणार सामने?
हे काय? पोलार्डने लाईव्ह सामन्यात पंचांना मारला बॉल आणि लागला हसू, कर्णधार रोहितनेही दिली साथ
केकेआरचा कर्णधार आणि कोचमध्ये नाही सर्वकाही अलबेल, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ