क्रिकेटटॉप बातम्या

पंजाबने लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूची विस्फोटक खेळी, संघाला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2025 साठी झालेल्या मेगा लिलावात (Mega Auction) अनेक युवा खेळाडूंचे नशीब चमकले. या खेळाडूंपैकी एक मुंबईचा सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) होता. ज्याला पंजाब किंग्जने (Punjab Kings) मेगा लिलावात 30 लाख रूपयांच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात सामील केले.

पंजाब किंग्जमध्ये (Punjab Kings) सूर्यांशची भर घालणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर झाले आहे. आयपीएल 2025 मध्ये पंजाबसाठी तो मैदानावर किती वादळ निर्माण करू शकतो, हे त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने दाखवून दिले आहे. वास्तविक, ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’च्या (Syed Mushtaq Ali Trophy) उपांत्यपूर्व फेरीत मुंबईसाठी सूर्यांशने दमदार फलंदाजी केली आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईचा सामना विदर्भाशी झाला. या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 221 धावा ठोकल्या. मुंबई संघानेही सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये एक क्षण असा आला की, हा सामना कोणत्याही दिशेने वळण घेऊ शकेल असे वाटत होते. त्यानंतर युवा खेळाडू सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) मैदानात उतरला.

सूर्यांशने मैदानात उतरताच विस्फोटक फलंदाजीला सुरुवात केली. त्याने महत्त्वाच्या सामन्यात केवळ 12 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. सूर्यांशच्या फलंदाजीमुळे मुंबईने या सामन्यात विजय मिळवला. आता रिकी पाॅन्टिंगच्या (Ricky Ponting) मार्गदर्शनाखाली पंजाब या विस्फोटक युवा खेळाडूचा आयपीएलमध्ये कसा वापर करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अजिंक्य रहाणे-पृथ्वी शॉची धमाल फलंदाजी, मुंबईचा संघ विजेतेपदापासून केवळ दोन पावलं दूर
IND vs AUS; भारतासाठी तिसरा सामना जिंकणे अवघड? गाबाच्या खेळपट्टीबाबत क्युरेटरचा मोठा खुलासा
गाबामध्ये भारतीय खेळाडू करू शकतात अनेक विक्रम! जसप्रीत बुमराहकडे मोठा पल्ला गाठण्याची संधी

Related Articles