रशिया। फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने आपला प्रवेश निश्चित केल्यामुळे स्वीडनचे अम्बॅसिडर(राजदूत) टॉरबजर्न सोहल्स्ट्रॉम यांनी संघाचे अभिनंदन केले.
तर दुसरीकडे इंग्लंडच्या चाहत्यांनी संघाने विजय मिळवताच आयकेइए या दुकानातील मालमत्तेचे नुकसान केले.
7जुलैला झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या 3ऱ्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनला 2-0 असे पराभूत केले.
“इंग्लंड संघाचे अभिनंदन. तुमच्या संघांची कामगिरी उत्तम आहे. तसेच तुमचा संघ आजच्या वेळेला ताकदवान तर गोलकीपरही उत्कृष्ठ आहे. तुमच्या या विजयामुळे मी आता थ्री लायन्स अर्थात इंग्लंड संघाला पांठिबा देणार आहे “, असे ट्विट सोहल्स्ट्रॉम यांनी केले.
Congratulations England. You had the stronger team today, and a great goalkeeper. When I have digested the result, I will support Three Lions.
— Torbjörn Sohlström (@sohlstromt) July 7, 2018
हे दोन विजयी गोल हॅरी मॅगवाईरने 30व्या तर डेले ऑली याने 59व्या मिनीटाला केले. समारा फुटबॉल अरेना येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा पराभव करत तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
इंग्लंडमधील स्वीडीश दुकान आयकेइए येथे इंग्लंडच्या चाहत्यांनी संघाचे विजय नोंदवल्यावर एकच जल्लोष केला. दुकानातील फर्निचर आदी वस्तू फेकत त्यांनी हा आंनद साजरा केला.
त्या दुकानाचे कर्मचारी यावेळी चाहत्यांकडे हताश होऊन बघत होते. तसेच आयकेइएने संघाचे अभिनंदन करत त्याबद्दल ट्विटही केले.
https://twitter.com/KingMo786/status/1015634554944671745
We are aware of a small group of fans celebrating the match result in one of our stores. Being both British and Swedish, we were on the edge of our seats during the game and we would like to say ‘grattis!’
— IKEA UK (@IKEAUK) July 7, 2018
इंग्लंडचा उपांत्य फेरीचा सामना क्रोएशिया विरूद्ध 11 जुलैला होणार आहे. क्रोएशियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान रशियाला पेनाल्टी शूट-आऊटमध्ये 4-3 असे पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषकात किस सत्र काही थांबेना; दोन रशियन महिलांनी केले दक्षिण कोरियन पत्रकाराला किस
–जगातील पहिलाच प्रयोग- क्रिस्तीयानो रोनाल्डो करणार फेसबुकबरोबर रिएलिटी शो