fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

5व्या एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत सिमेंटेक, टिएटो ऑटोमेशन संघाचा विजय

पुणे। सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत सिमेंटेक संघाने सीएलएसए टेक्नॉलॉजीज संघाचा तर टिएटो संघाने हार्मन संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निखिल भोगलेच्या अचूक गोलंजीच्या बळावर सिमेंटेक संघाने सीएलएसए टेक्नॉलॉजीज संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सीएलएसए टेक्नॉलॉजीज संघाने 20 षटकात 9 बाद 105 धावा केल्या. 105 धावांचे लक्ष सिमेंटेक संघाने केवळ 12.5 षटकात 3 बाद 108 धावा करून पुर्ण केले. यात पंकज कांबळेने 31, अमित सिंघलने 31 व भारत पल्लोडने नाबाद 22 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 18 धावांत 4 गडी बाद करणारा निखिल भोगले सामनावीर ठरला.

दुस-या सामन्यात उमेश तोमरच्या बिनचूक गोलंदाजीच्या जोरावर टिएटो संघाने हार्मन संघाचा 72 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुगम सांगोलेच्या 48 धावांसह टिएटो संघाने 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उमेश तोमर व अनुप यांच्या अचूक गोलंदाजीपुढे हार्मन संघ केवळ 15.4 षटकात सर्वबाद 78 धावांत गारद झाला. 6 धावांत 2 गडी बाद करणारा उमेश तोमर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-

साखळी फेरी:

सीएलएसए टेक्नॉलॉजीज- 20 षटकात 9 बाद 105 धावा(भावुक जराठ 21(23), जतिन मनधनीया 20(32), निखिल भोगले 4-18, पंकज कांबळे 2-13, सचिन जाधव 1-21, भारत पल्लोड 1-17) पराभूत वि सिमेंटेक- 12.5 षटकात 3 बाद 108 धावा(पंकज कांबळे 31(28), अमित सिंघल 31(28), भारत पल्लोड नाबाद 22(12), जतिन मानधनीया 1-24, दुर्गेश 1-5, आशिष कुमार सिंग 1-12) सामनावीर- निखिल भोगले
सिमेंटेक संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.

टिएटो- 20 षटकात 6 बाद 150 धावा(सुगम सांगोले 48(47), विक्रम माळी 26(16), प्रशांत दुधाने 22(26), अंकित जैन नाबाद 20(11), निशांत खेडालगे 3-19, अभिषेक धनवडे 1-16, शाहरुख कलमानी 1-28, हरेंद्र यादव 1-33) वि.वि हार्मन- 15.4 षटकात सर्वबाद 78 धावा(योगेश सोनिस 14(19), अभिषेक धनवडे 14(13), उमेश तोमर 2-6, अनुप 2-15, अंकित जैन 1-13, विनोद तांबे 1-11, विलास जगताप 1-7) सामनावीर- उमेश तोमर
टिएटो संघाने 72 धावांनी सामना जिंकला.

You might also like