---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी-२० सामने बंद करा- ग्रॅम स्मिथ

On: गुरूवार, मे 31, 2018 6:45 PM
---Advertisement---

आजच्या काळात क्रिकेटचे माजी खेळाडू आणि तज्ज्ञ कसोटी प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

यातच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त कसोटी आणि एकदिवसीय प्रकारातील सामने व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20च्या तुलनेत कसोटी क्रिकेट महत्वाचे आहे.याबद्दल आयसीसीने विचार करावा”, असे त्याने म्हटले.

मुंबईमधील एका कार्यक्रमात तो बोलत होता. यावेळी त्याने कसोटी क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली.

आयसीसीने सहा महिने देशांतर्गत टी-20 आणि सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळवावे. तसेच वन-डे विश्वचषक प्रत्येक दोन वर्षांत व्हावा, असे स्मिथने यावेळी सुचविले.

“खूप जणांच्या मते, टी-20 क्रिकेटमुळे कसोटीकडे दूर्लक्ष होत आहे. टी-20 मध्ये ज्याप्रकारे जास्त पैसा गुंतवला जात आहे ती खरच खूप मोठी बाब आहे. मात्र याचा परिणाम कसोटी क्रिकेटवर होत आहे. जर अशाचप्रकारे कसोटीमध्येही जास्त पैसा गुंतवला तर त्याचे स्वरूप बदलेल”,असेही स्मिथ म्हणाला.

काही आठवड्यांपूर्वी गौतम गंभीरने पण स्मिथ सारखेच मतं व्यक्त केले होते.

भारतीय कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करायची आहे. त्याच्या सारख्या जर आणखी खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला असेच महत्व दिले तर ती क्रिकेट जगासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे.

स्मिथने आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत 117 कसोटी, 197 वन-डे आणि 33 टी-20 सामने खेळले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment