ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वेगवान गोलंदाज टी नजराजनचा भारतीय संघात गुरुवारी(26 नोव्हेंबर) रात्री समावेश करण्यात आला आहे. याबद्दल बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली.
भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पाठिच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने नटराजनला वनडे संघात सामील करण्यात आले आहे, असे बीसीसीआयने सांगितले.
आयपीएलदरम्यान केले होते प्रभावित
आयपीएलच्या 13 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी20 मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. तो सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे.
टी नटराजनने 16 आयपीएल सामन्यांत 16 बळी घेतले असून या दरम्यान त्याची सरासरी 31.5 अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक 65-70 यॉर्कर चेंडू फेकले आहेत.
भारताचा वनडे संघ –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयंक अगरवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी , नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, टी नटराजन.