क्रिकेटच्या मैदानात कधी कधी अशा घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होत असते. अनेकदा प्रसंग इतके मजेशीर असतात की, चाहत्यांवर पोट धरून हासण्याची वेळ येते. असा काहीसा प्रसंग टी-२० ब्लास्टमध्ये पाहायला मिळाला. शुक्रवारी (२७ मे) पाहायला मिळाला.
टी-२० ब्लास्टचा (T20 Blast 2022) हा सामना लंकाशायर (Lancashire) आणि यार्कशायर (Yorkshire) या संघात खेळला गेला. उभय संघातील हा सामना अनिर्णीत झाला. लंकाशायर संघाचा कर्णधार डेन विलास (Dane Vilas) सोबत हा मजेशीर प्रसंग घडला. लंकाशायर संघाच्या क्षेत्ररक्षणावेळा विलास एका फलंदाजाला झेलबाद करण्याचा प्रयत्नात धावला, पण याप्रसंगी त्याची लाज जाता जाता राहिली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सामन्याच्या शेवटच्या षटकात यार्कशायरचे फलंदाज खेळपट्टीवर होते. त्यांना विजयासाठी २ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. यार्कशायरचा शादाब खान (Shadab Khan) स्ट्राईकवर फलंदाजी करत होता. वेगाने धावा करण्याचा नादात शाबादने एक हवाई शॉट खेळला, जो बराच वेळ हवेत राहिला. तेव्हाच शाबादचा झेल पकडण्यासाठी लंकाशायरचा कर्णधार धावत आला आणि डाईव्ह मारून झेल पकडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याला हा झेल पकडता आला नाही.
पण, झेल पकडताना विलासने जेव्हा डाईव्ह मारली, तेव्हा त्याची पॅंट खाली सरकली. त्याला पॅंट खाली घसरल्याचे जाणवताच तो तत्काळ उभा राहिला आणि पँट वर घेतली. मैदानात घडलेला हा प्रसंग पाहून चाहत्यांनी चांगलीच मजा घेतली. अनेकजण हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईक करत आहे आणि शेअर देखील करत आहेत.
टी-२० ब्लास्टच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे, जो पाहून चाहते लोटपोट झाले आहेत. व्हिडिओ खूपच वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
If the #RosesT20 didn't have enough drama…
Dane Vilas had an unfortunate moment 😂#Blast22 pic.twitter.com/WBq2gSpMRx
— Vitality Blast (@VitalityBlast) May 28, 2022
सामन्याचा विचार केला, तर लंकाशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात यार्कशायर संघाने देखील २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसनावार १८३ धावा केल्या. यार्कशायरच्या डावातील शेवटच्या चेंडूवर हॅरी ब्रुक एलबीडब्ल्यू बाद झाला. याच कारणास्तव सामना अनिर्णीत राहिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022। हार्दिकची ‘ही’ आकडेवारी देतेय गुजरातच्या विजेतेपदाची ग्वाही, पाहा नक्की काय आहे विक्रम
आयपीएलच्या फायनल आधीच चहलच्या पत्नीने लावला ठुमका, ‘जिगल जिगल’ गाण्यावरील व्हिडिओने लुटली वाहवा!
IPL Final 2022 I गुजरातसाठी स्वप्नवत प्रवास, तर राजस्थानने अनेक संकटे पार करत गाठलीये फायनल