संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष्य सध्या येत्या टी२० विश्वचषक २०२१ वर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे टी२० विश्वचषकाचे सामने खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी सोमवार रोजी (०६ सप्टेंबर) टी२० विश्वचषकात भारताचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान संघाची घोषणा झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी२० विश्वचषकासह संघाच्या आगामी न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीही हाच संघ कायम ठेवला आहे. पाकिस्तान त्यांचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे.
पीसीबीने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय टी२० संघाचे नेतृत्त्व बाबर आझमच करेल. त्याच्या नेतृत्त्वाखालील या संघात आसिफ अली आणि खुशदिल शाह यांचे पुनरागमन झाले आहे. तर सरफराज अहमद, शोएब मलिकसारख्या खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. सरफराजच्या जागी आजम खानला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच मोहम्मद रिझवान आणि आजम खान यांच्यापैकी एकावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल.
याशिवाय फखर जमान, शाहनवाज दहानी आणि उस्मा कादिर यांनी राखीव खेळाडूच्या रुपात सहभागी करण्यात आले आहे.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळेल. त्यानंतर १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची टी२० मालिका खेळेल.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2021
Asif and Khushdil return for ICC Men's T20 World Cup 2021
More details ➡️ https://t.co/vStLml8yKw#PAKvNZ | #PAKvENG | #T20WorldCup pic.twitter.com/9samGbJgDJ
— PCB Media (@TheRealPCBMedia) September 6, 2021
टी२० विश्वचषकासाठी असा आहे पाकिस्तानचा संघ
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, आसिफ अली, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, शोएब मकसूद, आजम खान, इमाद वसीम, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहदाब खान, हसन अली, हारिस राऊफ, मोहम्मद हसनैन, शाहिद आफ्रिदी.
राखीव खेळाडू: फखर जमान, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची झाली निवड, येत्या २४ तासात होणार घोषणा!
ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही
आधी शार्दुल मग रिषभ, मांजरेकरांचे कौतुकास्पद बोल अन् लयीतील फलंदाज तंबूत; झाले ट्रोल