टी-२० विश्वचषक २०२१ त्याच्या अतिंम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही ग्रुपमधील एक एक संघ पक्के झाले आहेत, तर काही संघ उपांत्य सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करत आहेत. ग्रूप एकमध्ये उपांत्य सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात संघर्ष सुरू होता. मात्र, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला. मात्र, त्यांना उपांत्या फेरीत पोहोचता आले नाही. दुसरीकडे ग्रूप दोनमध्ये भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघ उपांत्य सामना गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने या संघांविषयी एक मजेशीर ट्वीट केले आहे.
वसीम जाफर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमी ट्वीटरवर मजेशीर ट्वीट आणि मीम शेअर करतो. चाहतेही त्याच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. आता यावेळी वसीमने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या संघांविषयी एक खास आणि गमतीशीर ट्वीट केले आहे.
वसीमने केलेल्या ट्वीटमध्ये बॉलिवूड चित्रपट ‘धमाल’मधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेता रितेश देशमुखच्या गळ्यात फास लावला गेला आहे आणि तो अभिनेता जावेद जाफरीच्या खांद्यावर उभा आहे. अगदी त्याचप्रकारे अभिनेता आशीष चौधरी अरशद वारसीच्या खांद्यावर उभा आहे. वसीम जाफरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने या अभिनेत्यांना भारत-अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अशी नावे दिली आहेत. वसीमने या फोटोच्या माध्यमातून या संघांची सध्याची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चाहत्यांना वसीमने शेअर केलेला हा फोटो खूप आवडला आहे आणि त्यावर ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Current situation 😅: India and AUS not only need to win but need AFG and ENG to win too for certain/easier passage. #T20WorldCup pic.twitter.com/6K6x0q7ogs
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 6, 2021
विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि भारताची स्थिती या फोटोत दिसत आहे, त्याप्रमाणेच झाली आहे. उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी हे दोन्ही संघ इतर संघांवर अवलंबून आहेत. रविवारी (०७ नोव्हेंबर) होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्यात अफगाणिस्तान संघ जिंकला, तर भारतीय संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन ‘या’ ५ खेळाडूंना द्यावी संधी; वीरेंद्र सेहवागने सांगितली नावे
काय सांगता! राजस्थान रॉयल्सची साथ सोडून संजू होणार ‘या’ संघाच्या ताफ्यात सामील?
-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे