टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळली जात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे फिट होऊन परतला आहे. 23 ऑक्टोबर रोजी तो भारतीय संघाला आव्हान देईल. विशेष म्हणजे, त्याने सराव सामन्यांमध्येही सहभाग घेतला आहे. आफ्रिदीने सराव सामन्यांमध्ये खतरनाक गोलंदाजी केली आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी विश्वचषकातील सर्व सलामीवीरांबद्दल वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे माजी प्रशिक्षक असलेले टॉम मूडी (Tom Moody) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यासारख्या अनेक सलामीवीरांबद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणालेत की, शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ती पाहून भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल हे घाबरले असतील.
आफ्रिदीला जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर असताना खेळलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आशिया चषक 2022मधूनही बाहेर पडावे लागले होते. विशेष म्हणजे, पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही त्याला खेळता आले नव्हते. मात्र, आता तो पूर्णपणे फिट झाला आहे आणि त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यातही भाग घेतला. या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने अफगाणिस्तानच्या सलामीवीर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याला दुखापतग्रस्तही केले. शाहीन आफ्रिदीने एक घातक यॉर्कर चेंडू टाकला होता, जो थेट फलंदाजाच्या पायाच्या बोटांवर जाऊन लागला. त्याच्या या घातक यॉर्करने फलंदाजाला सहकाऱ्याच्या पाठीवर बसून मैदानाबाहेर जावे लागले होते.
‘शाहीन आफ्रिदी पूर्ण लयीत’
हे सर्व पाहू असे दिसते की, आफ्रिदी त्याच्या लयीत परतला आहे. दुसरीकडे, टॉम मूडी यांनीहीही विरोधी संघांसाठी हा मोठा धोका असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी कोणत्याही सलामीवीर फलंदाजाचे नाव न घेता म्हटले की, “शाहीन आफ्रिदीचे हे रूप पाहून विश्वचषकात सर्व सलामीवीर फलंदाजांना भीती वाटत असेल. आफ्रिदी आत्मविश्वासपूर्ण असून आणि तो हसत आहे. तो नवीन चेंडूने खूप घातक होतो. रहमानुल्लाह गुरबाजविरुद्धचा त्याचा चेंडू खूपच खतरनाक होता.”
विशेष म्हणजे, आफ्रिदीने मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारतालाही चिंतेत टाकले होते. त्याने रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांची विकेट घेतली होती. आता यावेळीही तो भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नींचे गांगुलीबद्दल मोठे विधान; म्हणाले, ‘त्याने भारतीय क्रिकेटचा…’
बीसीसीआय अन् पीसीबीमधील वाद मिटवण्याचा दम आयसीसीमध्ये आहे का? वाचा एका क्लिकवर