टी२० विश्वचषक २०२२ साठी रिजनल क्वालीफायर सामने खेळवले जात आहेत. आफ्रिका उपविभागातून तंजानियाने ग्रुप बीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. तंजानियाने १५ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या रिजनल फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. १५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या अफ्रिका प्रादेशिक फायनल टूर्नामेंटमध्ये केनिया आणि नायजेरियाने उत्कृष्ट प्रदर्शन करून मिळवलेल्या चांगल्या रँकिंगमुळे आधीच स्थान पक्के केले होते.
तसेच यूगांडाने ग्रुप ए मध्ये पहले स्थान मिळवून अफ्रिका रिजनल फायनलसाठी क्वालीफाय केले होते. आता या क्वालीफाय झालेल्या चार संघांपैकी पहिल्या स्थानावर राहणारा संघ टी२० विश्वचषक क्वालिफायरसाठी निवडला जाईल.
२ ते ७ नोव्हेंबरदरम्यान रवांडामध्ये खेळल्या गेलेल्या पाच संघांच्या क्वालीफायर ग्रुप बीमध्ये तंजानियाने ४ पैकी ४ सामने जिंकले आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. तसेच बोत्सवानाने चार पैकी तीन सामने जिंकून दुसरे स्थान मिळवले. सिएरा लियोनाने चार पैकी दोन सामने जिंकले आणि तिसरे स्थान मिळवले. तर मोजांबिकने चार पैकी एक विजय मिळवून चौथे स्थान मिळवले. कॅमरून संघ चार पैकी फक्त एक सामना जिंकू शकला आणि शेवटच्या स्थानावर राहिला.
तंजानियाने त्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण सामन्यात मोजांबिक विरुद्ध २४२ धावा केल्या होत्या आणि ८७ धावांनी विजय मिळवला होता. त्यांनी कॅमरूनविरुद्धही २४० धावा केल्या होत्या आणि १७८ धावांनी मोठा विजय मिळवला होता. तसेच सिएरा लियोनाला ८ विकेट्सने आणि बोत्सवानाला शेवटच्या सामन्यात तीन धावांनी पराभूत केले होते.
स्पर्धेत मोजांबिकने २०९ ही मोठी धावसंख्या केली होती, ज्याच्या प्रत्युत्तरात कॅमरून संघ अवघ्या ३८ धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. या सामन्यात मोजांबिकच्या फ्रांसिस्को कुआनाने १०४ धावा आणि ५ विकेट्स घेतल्या होत्या. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
तंजानियाच्या इवान सेलेमानीने चार सामन्यात सर्वाधिक २०७ धावा केल्या. तसेच बोत्सवानाच्या ध्रुव मैसूरियाने चार सामन्यात सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या. मोजांबिकच्या फ्रांसिस्को कुआनाने स्पर्धेतील एकमात्र शतक झळकावले. तसेच एका डावात पाच विकेट्स घेण्याचा विक्रमही स्वत:च्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौ-यावर जाणार ऑस्ट्रेलिया; ‘या’ दिवशी होणार मालिकेला प्रारंभ