आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा ही जगभरातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये गणली जाते. टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा किताब इंग्लंड संघाने आपल्या नावावर केला होता. यासोबतच आता इंग्लंडने पुढील वर्षाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. खरं तर, आयसीसीने 2024मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठीच्या प्रकारात बदल केले आहेत. कोणते आहेत ते बदल चला जाणून घेऊया…
टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळला जाणार आहे. यामध्ये कोणतीही पहिली फेरी, सुपर-12 फेरी होणार नाहीये. पुढील वर्षी या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेतील. यामध्ये एकूण 4 गट असतील, ज्यात प्रत्येक गटात 5 संघ असतील. यासोबतच प्रत्येक क्रिकेट प्रकारात कोणकोणते बदल होतील, पाहूयात.
नवीन प्रकारात खेळला जाईल टी20 विश्वचषक 2024
खरं तर, टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेचे यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडे आहे. त्यात एकूण 20 संघांचा समावेश असेल. ही स्पर्धा एकूण 3 गटात खेळली जाईल. प्रत्येक 5 संघाला 4च्या गटात विभागले जाईल. प्रत्येक गटाचे अव्वल 2 संघ सुपर-8 फेरीत एन्ट्री करतील. यानंतर सुपर- 8 राऊंडचे सर्व 8 संघांना 4-4च्या दोन गटात विभागले जाईल. सुपर- 8 फेरीत दोन्ही गटातील सर्व संघ आपापसात सामने खेळतील. यामधील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत एन्ट्री करतील.
दोन उपांत्य सामन्यामार्फत 4 संघांपैकी दोन संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवतील. म्हणजेच पुढील टी20 विश्वचषक खूपच वेगळा असणार आहे. त्यात पात्रता फेरी नसणार आहे. खरं तर, टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला होता. त्यामधील 8 संघांनी थेट सुपर 12 फेरीत एन्ट्री घेतली होती. तसेच, 4 संघ पात्रता फेरीतून सुपर-12मध्ये सामील झाले होते.
एकूण 12 संघ झालेत पात्र
खरं तर, टी20 विश्वचषक 2024साठी अमेरिका आणि वेस्ट इंडिज संघ आधीच या विश्वचषकासाठी पात्र झाले आहेत. याव्यतिरिक्त टी20 विश्वचषक 2022चे टॉप-8 संघांना पुढील टी20 विश्वचषक 2024साठी एन्ट्री मिळाली आहे. या संघांमध्ये इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघांनाही पुढील विश्वचषकासाठी एन्ट्री मिळाली आहे. अशात इतर 8 संघांना पात्रता सामने खेळावे लागतील. (t20 world cup 2024 change in format total 20 teams will participate for qualification round know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी भविष्यवाणी करतोय विश्वचषकात विराट गंभीरसारखाच…’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे भाष्य
डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक