---Advertisement---

जसप्रीत बुमराह अमेरिकेविरुद्ध का खेळत नाही? कर्णधार सूर्यकुमार यादवचा टॉसच्या वेळी मोठा खुलासा!

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 7:28 PM
---Advertisement---

भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) मधील आपला पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (USA) खेळत आहे. या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले असून, मॅच विनर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात खेळणार नाही.

टॉसच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने बुमराहच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले. त्याने सांगितले की, दुर्दैवाने जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट नसल्याने, त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj) संधी देण्यात आली आहे.

बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, आजारपणामुळे बुमराह निवडीसाठी उपलब्ध नव्हता. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

टॉस गमावल्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, आम्हाला आधी फलंदाजीच करायची होती. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली दिसतेय. मी इथे खूप क्रिकेट खेळलो आहे. सामन्याचा थोडा दबाव नक्कीच असेल, पण आम्ही गेल्या एक-दोन वर्षांपासून ज्या आक्रमक पद्धतीने खेळत आहोत, तीच पद्धत सुरू ठेवू इच्छितो. आमच्या संघात आज वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन देखील नाहीत.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि अमेरिका दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. गेल्या वेळी 2024 मध्ये भारताने अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला होता. आजच्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात असून, टीम इंडिया विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---