Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, ‘पाकिस्तानचा गोलंदाज खूपच…..’

मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, 'पाकिस्तानचा गोलंदाज खूपच.....'

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Mohammed Shami Shaheen Afridi

Photo Courtesy: Twitter


टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup) च्या हंगामात भारत-पाकिस्तान रविवारी (23 ऑक्टोबर) एकमेकांचा सामना करणार आहेत. क्रिकेटविश्वातील हा महत्वपूर्ण सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. मागील काही सामन्यांमधील दोन्ही संघाची कामगिरी पाहिली तर दोघेही उत्तमच खेळले आहेत. यामुळे टी20 विश्वचषकात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. हा सामना कोण जिंकेल हे दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे. यामध्ये पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी आणि भारताकडून मोहम्मद शमी हे आघाडीवर आहेत. कारण हे दोघेही सुरूवातीच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये ज्याप्रकारे गोलंदाजी करतात त्याने संपूर्ण सामन्यांचे चित्र पालटले जाते, मात्र या दोघांपैकी कोण सर्वश्रेष्ठ याबाबत भारताच्या माजी विश्वविजेत्या खेळाडूने मोठे विधान केले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला अनुभव असून तो एक कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे, मात्र या टी20 विश्वचषकासाठी तो भारताची पहिली पसंत नव्हता. त्याला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या जागी संघात घेतले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) सध्या जगातील वेगवान धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. यामुळे या दोघांवरही चांगलाच दबाव असणार आहे.

भारताचे माजी अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांनी एका वृत्त माध्यमाशी बोलताना म्हटले, “तुम्ही केवळ एका षटकातच त्यांची कामगिरी किती चांगली हे ठरवू शकत नाही. मागील दोन वर्षांची कामगिरी पाहिली तर शाहीनचे चांगले प्रदर्शन ठरले आहे. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा त्याने त्याचे सोने केले आहे आणि संघाला विजय मिळवून दिला आहे. मला शाहीन आणि शमीची तुलना नाही करायची, मात्र शमीने सध्या अधिक क्रिकेट खेळले नाही. मी बुमराह आणि शाहीनची तुलना करेल पण शमी-शाहीनची तुलना नाही करू शकत, कारण त्यांच्यात खूप मोठे अंतर आहे.”

शमी 2021च्या टी20 विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 विश्वचषक 2022च्या सराव सामन्याच्या एका षटकात तीन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच शाहीनने मागील टी20 विश्वचषकात भारताची वरची फळी उधवस्त केली होती, मात्र त्याला जुलैमध्ये दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. त्याने इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध वॉर्म-अप सामने खेळले, मात्र तो पूर्णपणे फिट नाही असे एक्सपर्टचे म्हणणे आहे.

नुकतेच भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्येच तिंरगी टी20 मालिकेत पराभव केला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लेट पण थेट! 2007 ते 2022, न्यूझीलंडने चार वेळा केला ऑस्ट्रेलियाचा दौरा, पण शेवटी ऑस्ट्रेलियाला लोळवलंच
‘टेस्ट स्पेशालिस्ट’ कॉनवेचा टी20 मध्ये धूमाकूळ! भल्या-भल्यांना मागे सोडत पोहोचला टॉपवर


Next Post
Afg-vs-Eng

अवघडंय! अफगाणिस्तानच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद, दहाच्या दहा खेळाडूंवर ओढवली 'ही' नामुष्की

Photo Courtesy: Twitter/England Cricket

वेगाचा नवा बादशाह! वूडने केलीये टी20 इतिहासातील सर्वात भन्नाट गोलंदाजी

sam curran

नाद नाद नादच! टी20 विश्वचषकात सॅम करन निघाला सगळ्यांचाच बाप, बनला इंग्लंडचा पहिलाच खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143