ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) पहिल्या फेरीत गट बमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आर्यलंड यांच्यात सामना खेळला गेला. बेलेरिव ओवल, होबार्ट येथे खेळला गेलेला हा सामना जो जिंकेल तो संघ सुपर 12मध्ये पोहोचणार होता. यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. यामध्ये आयर्लंडने बाजी मारली आहे. त्यांनी वेस्ट इंंडिजला तब्बल 9 विकेट्सने पराभूत करत टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12मध्ये धमाक्यात एंट्री केली आहे. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच वेस्ट इंडिजचा संघ सुपर 12मध्ये पोहोचण्यास अपयशी ठरला आहे.
आर्यलंडने लक्ष्याचा पाठलाग करताना 4.2 षटकातच धावफलकावर 50 धावा जोडल्या. त्यांचा कर्णधार-सलामीवीर अँड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 45 चेंडूत 73 धावांची भागीदारी रचली. बालबर्नीने 23 चेंडूत 37 धावा केल्या. तसेच स्टर्लिंगने 32 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत 48 चेंडूत 66 धावा केल्या. त्याला लोर्कन टकर याने उत्तम साथ दिली. स्टर्लिंग-टकरने दुसऱ्या विकेटसाठी 61 चेंडूत नाबाद 77 धावांची भागीदारी केली.
Stirling to the stands!
We can reveal that this 6 from Paul Stirling is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos of the Game packs from West Indies v Ireland.
Grab your pack from https://t.co/8TpUHbQQaa to own iconic moments from every game. pic.twitter.com/Np7zfM0jfK
— ICC (@ICC) October 21, 2022
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकल्याचे लवकरच लक्षात आले, कारण कायले मेयर्स हा एक धाव करतच तंबूत परतला. 10.5 षटके झाली असता वेस्ट इंडिजने 71 धावसंख्येवर 3 विकेट्स गमावल्या. त्यांच्याकडून ब्रेंडन किंग याने डाव सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 48 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि एक षटकार खेचला. त्याच्या या खेळीने वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 146 धावसंख्या उभारली.
या सामन्यात आयर्लंडचा खेळ प्रभावशाली वाटला, तर वेस्ट इंडिजचा ढिसाळ वाटला. या स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघात अनुभवी खेळाडू नसल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे.
या सामन्यानंतर एक जाणवले, काही संघासाठी आठवा विश्वचषक उत्तम तर काही संघासाठी वाईट ठरला आहे. झाले असे की या स्पर्धेत सुपर 12चे आठ संघ निश्चित आहेत. तर उर्वरित बाकी चार संघाना पहिली फेरी पार करावी लागली. यामधून श्रीलंका, नेदरलॅंड्स आणि आता आयर्लंड हे सुपर 12मध्ये पोहोचले तर दोन वेळेचा विश्वचषक विजेता वेस्ट इंडिज या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांनी 2012 आणि 2016 ला टी20 विश्वचषक जिंकला आहे.
Ireland are through to the Super 12 🎉
A comprehensive performance in Hobart sees them knocking West Indies out of the tournament#T20WorldCup |#IREvWI | 📝: https://t.co/LNaSAJSEKW pic.twitter.com/iT0mYvnNzP
— ICC (@ICC) October 21, 2022
वेस्ट इंडिजने या स्पर्धेत पहिल्या फेरीचे तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. यामुळे ते पहिल्या फेरीच्या ब गटाच्या गुणतालिकेत तळाला आहेत. तसेच दुसरा सामना स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात होणार आहे. यातील जिंकणारा संघ सुपर 12मध्ये जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघाच्या जर्सीत दिसला रोहित शर्मा! पाहा नक्की काय आहे प्रकरण
आशिया चषक 2023 विषयी रॉजर बिन्नींची पहिली प्रतिक्रिया, दिले स्पष्ट उत्तर