टी20 विश्वचषक 2022चा रविवारी (16 ऑक्टोबर) पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नामिबिया (SLvNAM)असा रंगला. ऑस्ट्रेलियाच्या जिलाँगमधील सायमंड्स स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना नामिबियासाठी महत्वाचा ठरला. नामिबियाच्या या विजयाचा शिल्पकार जॅन फ्रायलिंक ठरला. त्याने अष्टपैलू खेळी करत नामिबियाला मोठा विजय मिळवून दिला. त्यांनी श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव करत टी20 विश्वचषकातील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
नामिबियाने दिलेल्या 164 लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात वाईट झाली. 21 धावसंख्येवरच कुशल मेंडिस (6), पथुम निसांका (9) आणि दनुष्का गुणतिलका (0) या महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. त्यानंतर धनंजया डी सिल्व्हा आणि भानुका राजपक्षे यांनी सामना सांभाळण्याचा प्रयत्न केला. काहीअंतराने ते दोघे बाद झाले. यानंतर श्रीलंकेच्या विकेट्स पडतच राहिल्या. त्यामुळे संघ 19 षटकात 108 धावांवरच गारद झाला.
नामिबियाचा विजय आणि विक्रमाला गवसणी
नामिबियाने नाणेफेक हरली असली तरी त्यांनी श्रीलंकेला नमवले आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये विक्रमाच्या यादीत स्थान मिळवले आहेत. नामिबिया आंतरराष्ट्रीय टी20मध्ये असोसिएट संघ (आयसीसीचा सहयोगी सदस्य) विरुद्ध पूर्ण सदस्य संघ यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा विजय मिळवणारा तिसरा संघ ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एक असोसिएट संघ विरुद्ध पूर्ण सदस्य संघ यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा धावांच्या फरकाने मिळवलेला विजय-
81 धावा अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, शारजाह 2016
59 धावा अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, नागपूर 2016
55 धावा नामिबिया विरुद्ध श्रीलंका, जिलाँग 2022
54 धावा युएई विरुद्ध आयर्लंड, दुबई 2021
An iconic win to mark the beginning of ICC Men's #T20WorldCup 2022 👏
Watch the complete highlights ➡ https://t.co/g8WCpiCQdz#SLvNAM pic.twitter.com/8ZLQQhE84h
— ICC (@ICC) October 16, 2022
विजयाचा शिल्पकार जॅन फ्रायलिंकची कामगिरी
नामिबिया 15व्या षटकात 6 बाद 93 धावा अशा स्थितीत असताना जॅन फ्रायलिंक याने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने जेजे स्मीट याच्यासोबत 69 धावांची भागीदारी केली. त्यामुळे नामिबियाने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावासंख्या उभारली. तसेच त्याने 4 षटकात 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने धनजंया डी सिल्व्हा आणि श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका यांच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या अष्टपैलू खेळीमुळे तो सामनावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खुद्द सचिनही झाला ‘जायंट किलर’ नामिबियाचा फॅन; कौतुकासाठी वापरला हा फेमस डायलॉग
भारत-पाक ‘क्रिकेटयुद्ध’ होणाऱ्या एमसीजीचा काय आहे इतिहास? कशी आहे आकडेवारी? वाचा सविस्तर