सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. भारतीय संघ यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले असून ग्रुप दोनच्या गुणतालीकेत संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारताला उपांत्या सामन्यात पोहोचण्यासाठी पुढच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकावे लागणार आहेत. असे असले तरी, संघाचा पुढचा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नसेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (30 ऑक्टोबर) लढत होईल. हा सामना जिंकण्यासाठी भारताला काही सुधारणा कराव्या लागणार आहेत.
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळला. या सामन्यात पाकिस्तानला चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात एक रोमांचक लढत पाहायला मिळाले. विश्वचषकातील या दुसऱ्या सामन्यात भारताने 56 धावांनी विजय मिळवला. आता संघाला दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या संघाविरुद्धचे सामने खेळायचे आहेत. उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला अजून दोन विजय मिळवावे लागणार आहेत.
झिम्बाब्वे आणि बांगलादेशचे आव्हान सोपे आहे, असे अनेकांना वाटत आहे. परंतु या दोन्ही संघांन भारत हलक्यात घेऊ शकत नाही. झिम्बाब्वेने नुकतेच पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन करून विजय मिळवला. अशात भारतीय संघाविरुद्ध देखील झिम्बाब्वे अशाच पद्धतीने चांगले प्रदर्शन करेल, याची शक्यता नाकारता येणार नाही. दुसरीकडे बांगलादेशविरुद्ध भारताची आकडेवारी चांगली राहिली आहे, पण या संघाला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. भारताची खरी परीक्षा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच असणार आहे.
केएल राहुल फॉर्ममध्ये परतने महत्वाचे –
भारतीय संघ सध्या विजयीरथावर सवार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुल () यांच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असतील. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलने चांगलीच निराशा केली होती. राहुलने आफ्रिकी संघाविरुद्ध चांगले प्रदर्शने करावे, असे संघ व्यवस्थापनाला देखील वाटत असावे.
टी-20 विश्वचषकात रविंद्र जडेजा () भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार होता. परंतु ही स्पर्धा सुरू होण्याआधी जडेजाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आणि त्याने विश्वचषकातून माघार देखील घेतली. जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला भारतीय संघात निवडले गेले, पण त्याने अध्याप अपेक्षेप्रमाणे खेळ दाखवला नाहीये. पाकिस्तानविरुद्ध अक्षरने एकाच षटकात 21 धावा दिल्या होत्या. अक्षर पटेलला पुढच्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि जडेजाप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील करावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक एक विक्रम अनेक! फिलिप्सच्या सेंच्युरीने रचले दोन रेकॉर्ड, एकात बनलाय जगातील पहिला फलंदाज
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम