क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज विकेट्स घेतल्यानंतर विविधप्रकारचे सेलिब्रेशन करताना दिसून येतात. मात्र बुधवारी(4 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज ताब्राइज शम्सीने अनोखे सेलिब्रेशन करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याने विकेट घेतल्यानंतर चक्क जादू करत सेलिब्रेशन केले.
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या मझांसी सुपर लीगमध्ये बुधवारी पार्ल रॉक्सकडून खेळताना शम्सीने डर्बन हिटचा फलंदाज विहाब लूबेला बाद केले. त्यानंतर त्याने सेलिब्रेशन करताना खिशातील लाल रुमाल काढला आणि त्या रुमालाची लगेचच छडी तयार झाली. ही जादू पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते.
मझांसी सुपर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ह्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘विकेट आणि शम्सीकडून छोटी जादूही.’
https://twitter.com/MSL_T20/status/1202287999020650496
या सामन्यात शम्सीने 2 विकेट्स घेतल्या. मात्र तो त्याच्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. या सामन्यात पार्ल रॉक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 195 धावा केल्या होत्या. त्यानंतर 196 धावांचे आव्हान डर्बन हिटने 18.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार करत 6 विकेट्सने विडय मिळवला.
"भारताची आक्रमक गोलंदाजी एका दिवसात तयार झाली नाही"
वाचा- ????https://t.co/cnwYT78neQ????#म #मराठी #crickets #TeamIndia @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 5, 2019
एमएस धोनी गातोय हे बॉलिवूड गाणं, व्हिडिओ झाला व्हायरल
वाचा????https://t.co/0hcqeKa5Up????#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia #MSDhoni— Maha Sports (@Maha_Sports) December 5, 2019