अफगानिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, तो म्हणजे अफगानिस्तान क्रिकेटच भविष्य काय असणार? मात्र आता चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. तलिबानने क्रिकेटमध्ये आवड असल्याचे दाखवले आहे. असे असले तरीही महिला क्रिकेटचे भविष्य अजूनही संकटात दिसत आहे. अफगानिस्तानचा संघ तालिबानच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना दिसू शकतो. तालिबानने या वर्षाच्या शेवटी अफगानिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला परवानगी दिली आहे. तसेच तालिबानने भारताविरुद्ध कसोटी मालिकेचे आयोजन करण्याविषयीही भाष्य केले आहे.
तालिबानची इच्छा आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यात भारतासोबत कसोटी मालिकेचे आयोजन केले जावे. असे असले तरीही बीसीसीआयने याबाबत कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आगामी दौऱ्याची माहिती दिली आहे.
एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारीने भारताच्या दौऱ्याविषयी सांगितले की, “तालिबान सरकार क्रिकेटचे समर्धन करत आहे आणि आमचे सर्व क्रिकेट सामने निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे आयोजित केले जाणार आहेत. तालिबान सांस्कृतिक आयोगाच्या एका प्रवक्त्याने आम्हाला सांगितले की, तालिबान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला समर्थन देईल. यानंतर २०२२ मधील पहिल्या तीन महिन्यात भारताविरुद्ध कसोटी मालिका होईल.” भारत आणि अफगानिस्तान यांच्यात याआधी २०१८ मध्ये बेंगलेरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर एक कसोटी सामना झाला होता.
शिनवारीने तलिबानद्वारे क्रिकेटला त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतेच्या समर्थनाविषयी सांगितले आहे. कसोटी सामन्याआधी अफगानिस्तान ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकात भाग घेणार आहे. शिनवारीने सांगितले, “ते क्रिकेटचे समर्थन करत आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. हा युवकांसाठी एक स्पष्ट संदेश आहे की, ते खेळांचे समर्थन करतील. हे सर्व चांगले संकेत आहेत.”
असे असले तरी, शिनवारी अफगानिस्तानच्या महिला क्रिकेटविषयी खात्री देऊ शकला नाही. तो म्हणाला, “आम्हाला सध्या यबाबत काहीही माहित नाही. सरकार याच्यावर निर्णय घेईल.”
अफगानिस्तान यूएईत टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सरावासाठी तिरंगी मालिकेचे आयोजन करणार आहे. याविषयी बोलताना शिनवारी म्हणाला, “आम्ही एका तिरंगी टी२० मालिकेसाठी काम करत आहोत, ज्यामध्ये अफगानिस्तान, वेस्टइंडिज आणि श्रीलंका यांचा सहभाग असेल. शक्यतो टी२० विश्वचषकाच्या आधी या मालिकेचे आयोजन यूएईमध्ये केले जाईल. तिरंगी मालिकेआधी एक राष्ट्रीय शिबिर आयोजला जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
क्वारंटाईनमध्ये राहून वसीम अकरमची पडली टक्कल; बघून तोंडून निघेल, ‘ये क्या हुआ? कैसे हुआ?’
क्रिस वोक्स इज बॅक! रोहित शर्माची ११ धावांवर विकेट घेत वर्षभरानंतर केले दमदार पुनरागमन, पाहा व्हिडिओ
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला होते क्रिकेटचे प्रचंड वेड, पाहा त्याच्या तुफान फटकेबाजीचा व्हिडिओ