fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन हिचे सलग दुसरे विजेतेपद

February 1, 2020
in अन्य खेळ
0

पुणे । बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलींच्या गटात तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन हिने कर्नाटकाच्या कीर्थना पंडियनचा पराभव करून विजेतेपद पटकावत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलींच्या गटात अंतिम फेरीत गतविजेत्या तामिळनाडूच्या 17वर्षीय अनुपमा रामचंद्रन हिने कर्नाटकाच्या कीर्थना पंडियनचा 147-83 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

अनुपमा हि चेन्नई येथे टीएनबीएसए आणि मायलापोर क्लब येथे प्रशिक्षक एसए सलीम यांच्या मार्गदर्शनखाली सराव करते. विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना अनुपमा म्हणाली कि, माझे हे सब-ज्युनियर बिलियर्ड्समधील सलग दुसरे विजेतेपद आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मी प्रत्येक सामन्यात लक्षपूर्वक खेळ केला. स्पर्धेत माझ्या कामगिरीत मला सातत्य राखता आले व त्यामुळेच विजेतेपदावर पुन्हा एकदा आपले नाव करू शकले.

याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अनुपमा रामचंद्रन हिने मध्यप्रदेशच्या कनिशा जूरानीचा 215(34)-75 असा तर, कर्नाटकाच्या कीर्थना पंडियन हिने मध्यप्रदेशच्या सान्वी शहाचा 186-95 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत मध्यप्रदेशच्या सान्वी शहा हिने आपलीच राज्य सहकारी कनिशा जूरानीचा 104(17)-85 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

सब-ज्युनियर मुलींच्या स्नूकर गटात बाद फेरीत तामिळनाडूच्या साफिलो सारा बेनी हिने कर्नाटकच्या मोक्षा एल.एसचा 2-0(53-11, 44-23) असा तर, तामिळनाडूच्या सेनेथरा बाबू हिने मध्यप्रदेशच्या प्रिया चोक्सीचा 2-0(50-35, 50-21) असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल।

सब-ज्युनियर मुली बिलियर्ड्स।

उपांत्य फेरी।

अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.कनिशा जूरानी(मध्यप्रदेश)215(34)-75;

कीर्थना पंडियन(कर्नाटक)वि.वि.सान्वी शहा(मध्यप्रदेश)186-95;

अंतिम फेरी।

अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि. कीर्थना पंडियन(कर्नाटक)147-83;

तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी: सान्वी शहा(मध्यप्रदेश)वि.वि.कनिशा झुरानी(मध्यप्रदेश)104(17)-85;

सब-ज्युनियर मुली स्नूकर।

बाद फेरी।

साफिलो सारा बेनी(तामिळनाडू)वि.वि.मोक्षा एल.एस(कर्नाटक)2-0(53-11, 44-23);

आन्या पटेल(गुजरात)वि.वि.कनिशा जूरानी(मध्यप्रदेश)2-1(67-32, 30-47, 51-35);

अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.सौम्या सिंग(मध्यप्रदेश)2-0(65-28, 64-16);

सान्वी शहा(मध्यप्रदेश)वि.वि.तन्वीर गौहर(मध्यप्रदेश)2-0(58-40, 58-17);

अनिता बिजू(केरळ)वि.वि.हाजरा फारुखी(मध्यप्रदेश)2-0(39-15, 50-42);

मोहिता आरआय(तामिळनाडू)वि.वि.श्रेया दुबे(मध्यप्रदेश)2-0(56-30, 57-02);

सेनेथरा बाबू(तामिळनाडू)वि.वि.प्रिया चोक्सी(मध्यप्रदेश)2-0(50-35, 50-21);

वरिष्ठ स्नूकर मुले।

डबल एलिमनेशन फेरी।

गट अ: प्रवेश जैदका(चंदीगड)वि.वि.दिव्या ज्योती(झारखंड)3-0(78-54, 55-34, 58-28);

गट अ: त्रिदिब डेका(आसाम)वि.वि.भारत सीव्ही(कर्नाटक)3-1(71-20, 02-60, 68-28, 60-35);

गट अ: हरप्रीत सिंग(दिल्ली)वि.वि.प्रियांक जैस्वाल(मध्यप्रदेश)3-1(113(113)-09, 60-67, 67-60, 67-41);

गट अ: नरेश कुमार(तेलंगणा)वि.वि.डी. गंगाधर(आंध्रप्रदेश)3-2(50-59, 64-19, 49-63, 64-47, 65-58);

गट ब: के. श्रीनु(आरएसपीबी)वि.वि.आर.लोंगनाथन(तामिळनाडू)3-0(60-28, 58-29, 83(56)-18);

गट ब: सरफराज एसके(पश्चिम बंगाल)वि.वि.तुषार श्रेष्ठा(बिहार)3-1(41-43, 72-36, 69(56)-01, 80-32;

गट ब: स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.रुचिर मसंद(मध्यप्रदेश)3-1(66-29, 73-22, 53-61, 62-25);

गट क: पियुष खुशवा(मध्यप्रदेश)वि.वि.राजीव शर्मा(महाराष्ट्र)3-2(68-22, 95(64)-15, 39-74, 16-58, 74-08);

गट फ: सिद्धार्थ पारीख(महाराष्ट्र)वि.वि.सलील देशपांडे(महाराष्ट्र)3-0(65-22, 76-07, 67-33).


Previous Post

…म्हणून सुपर ओव्हरमध्ये केली गोलंदाजी, अनलकी टीम साऊथीचा मोठा खूलासा

Next Post

बॅडमिंटन स्पर्धा २०२०; ख्याती, सोयरा, नील, विराज अंतिम फेरीत

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/@thenr'roast
अन्य खेळ

दोन संघांच्या चाहत्यांमध्ये पेटला वाद, केली जबरदस्त मुक्क्यांची बरसात; पाहा लाईव्ह सामन्यातील ढिशुम ढिशुम!

April 6, 2021
Photo Courtesy: Twitter/WWE
अन्य खेळ

‘डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम’मध्ये ‘द ग्रेट खली’चा समावेश, घोषणेने झाला भावुक

March 25, 2021
Photo Courtesy: Twitter
अन्य खेळ

ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेपूर्वी कोसळली प्रेक्षक गॅलरी

March 27, 2021
अन्य खेळ

ज्युनियर राष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिप स्पर्धा: महाराष्ट्राला 3 रौप्य आणि ४ कांस्य

March 21, 2021
Photo Courtesy: Twitter/afiindia
अन्य खेळ

ऑलिंपिकमध्ये नाव काढणार! राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या बीडच्या अविनाश साबळेचे धनंजय मुंडेंकडून कौतुक

March 20, 2021
Photo Courtesy: Twitter/WBCBoxing
अन्य खेळ

बॉक्सिंग जगताला मोठा धक्का! ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्विन हेगलरचे निधन

March 15, 2021
Next Post

बॅडमिंटन स्पर्धा २०२०; ख्याती, सोयरा, नील, विराज अंतिम फेरीत

मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर स्नूकरमध्ये तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन हिला विजेतेपद

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या दुहेरीसाठी लिएन्डर पेसला वाईल्ड कार्ड

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.