आयपीएल 2023 सुरू होऊन दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. यादरम्यान स्पर्धेत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने देखील पहिल्या पराभवातून सावरत सलग दोन विजय संपादन केले. असे असतानाच आता चेन्नई संघाबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. चेन्नई संघाला आयपीएलमधून बॅन करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी थेट तमिळनाडू विधानसभेत केली गेली.
तमिळनाडू विधानसभेच्या चर्चेदरम्यान पीएमके पक्षाचे धर्मपुरी येथील आमदार व्यंकटेशन अशा प्रकारची मागणी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ते म्हणाले,
“सदर संघ चेन्नई या तमिळनाडूच्या राजधानीचे नाव लावतो. मात्र, राज्यातील खेळाडूंना या संघात संधी दिली जात नाही. राज्याकडून यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतोय मात्र याचा राज्यातील युवा खेळाडूंना काय फायदा?”
व्यंकटेशन यांनी विधान भवना बाहेर आल्यानंतर देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आपल्या राज्याच्या राजधानीचे नाव एक संघ वापरतोय आणि त्या संघात राज्यातील एकही खेळाडू नाही हे दुर्दैवी आहे. मी हा मुद्दा विधानसभेत उचलला मात्र यावर अपेक्षित उत्तर मिळाले नाही. मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री याबाबत नक्कीच विचार करतील. आपल्या खेळाडूंना आपणच प्रोत्साहन द्यायला हवे.”
त्याचवेळी AIADMK पक्षाच्या आमदारांनी आपल्याला चेन्नई येथील सामन्याचे पासेस दिले जात नसल्याचा आरोप लावला. फ्रॅंचायजीकडून राज्य सरकारला 400 दिलेले असताना आपल्या पक्षातील आमदारांना एकही पास उपलब्ध करून दिला नसल्याचे त्यांनी म्हटले. विरोधी पक्षाचे नेते वेलूमनी यांनी काहीही करून आम्हाला सामन्याचे पास द्यावेत अशी विनंती देखील क्रीडामंत्र्यांना केली.
(Tamilnadu Assembly Member Demanding Ban On Chennai Super Kings For Not Selecting State Players In CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिट असूनही स्टोक्स खेळणार नाही! चेन्नई-राजस्थान सामन्याआधी माजी दिग्गजाची भविष्यवाणी
“माझे स्वप्न पूर्ण झाले”, दिल्लीला पराभूत केल्यानंतर तिलक वर्माने दिली भावनिक प्रतिक्रिया