वनडे विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघ मंगळवारी (26 सप्टेंबर) घोषित केला गेला. या संघाचे नेतृत्व शाकिब अल हसन करणार आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी लिटन दास याच्याकडे सोपवली गेली आहे. अगदी दोन महिन्यांपर्यंत संघाचा कर्णधार असलेला तमिम इक्बाल याला विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर आता त्याने या प्रकरणावर पुढे येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जुलै महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेवेळी तमिम याने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्याने आपला हा निर्णय केवळ 24 तासांमध्ये मागे घेतलेला. त्यानंतर त्याला कर्णधार पदावरून हटवून याच्याकडे नेतृत्व दिले गेले. तसेच अफगाणिस्तान व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमध्ये व आशिया चषकात तमिमला संघात स्थान मिळाले नव्हते. तसेच आता विश्वचषकात देखील तो खेळताना दिसणार नाही. याविषयी आता तो समोर येत बोलला आहे. तो म्हणाला,
“अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिके वेळी मला बोर्डातील काही सदस्यांकडून सांगण्यात आले की, तुला आता मधल्या फळीत किंवा खालच्या क्रमांकावर खेळावे लागेल. हे ऐकून मी चकित झालो तसेच मला रागही आला. माझ्या सतरा वर्षाच्या कारकीर्दीत मी पूर्णपणे फिट असताना कधी तिसऱ्या क्रमांकावरही खेळलो नाही. हे माझ्यासाठी शक्य नव्हते.”
तमिम आता आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आता आगामी विश्वचषक तो खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असून, असे झाल्यास त्याच्या शानदार कारकिर्दीची अखेर होईल.
वडने विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघ –
शाकिब अल हसन (कप्तान), मुश्फिकुर रहीम, लिटन दास (उपकप्तान), नजमुल हुसैन शान्तो, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद, महेदी हसन, तंजीम हसन साकिब, तंजीद हसन तमीम व महमूदुल्लाह रियाध
(Tamim Iqbal Speaks On His Exclusion From Bangaladesh Team)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी