पुणे| स्पोर्टिफिकेशन ऑल इंडिया या विषयाअंतर्गत ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सने सलग चौथ्या वर्षी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
भारतातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात सुरक्षित अशा हॅचबॅक श्रेणीतील टाटा अल्ट्रोज गाडीचा दुसरा वर्धापदन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने टाटा मोटर्स पुन्हा एकदा टेनिसशी जोडले गेले आहेत. दक्षिण आशियात होणारी महाराष्ट्र ओपन ही जशी सर्वात जुनी स्पर्धा, तशी भारताच्या गतिशील क्रांतीमध्ये गेली ७५ वर्षांहून अधिक काळ टाटा मोटर्स आघाडीवर आहे. स्मार्ट, शाश्वत आणि एकात्मता अशा विविघ गुणधर्माशी जवळीक साधणारी अनेक वाहने टाटा मोटर्सने निर्माण केली. ज्यात कार, स्पोर्टस युटिलिटी वाहने, ट्रक, बस आणि संरक्षण वाहनांचा समावेश आहे.
टाटा मोटर्सबाबत बोलताना विक्री आणि विपणन तसेच ग्राहक सेवा शाखेचे उपाध्यक्ष राजन अंबा म्हणाले, ‘भारतात एक उत्तम क्रीडा संस्कृती आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात बलशाली व्हावे अशीच आम्ही कायम इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेसाठी सलग चौथ्या वर्षी आर्थिक पुरस्कार देण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. या वर्षी आमची टाटा अल्ट्रोज ही गाडी दुसरा वर्धापनदिन साजरा करत आहे. या स्पर्धेतील खेळाडूंप्रमाणेच टाटा अल्ट्रोझने लाखो भारतीयांनी मने जिंकली आहेत. या स्पर्धेशी जोडले गेल्याचा आम्हाला खूप फायदा होईल. या स्पर्धेत नेहमीच सर्वोत्तम टेनिस खेळले जाते. या वर्षी देखिल ते खेळले जाईल यात शंका नाही.’
महाराष्ट्र लॉन टेनस संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेची मालकी आयएमजीकडे असून, राईज वर्ल्डने त्याला सहकार्य केले आहे. ही स्पर्धा २००२ ते २००४ दरम्यान चेन्नई येथे झाली तेव्हा देखिल टाटा कंपनीने आर्थिक पुरस्कार दिला होता. ही स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रात घेण्याचा निर्णय झाला, तेव्हापासून टाटा मोटर्सने या स्पर्धेसाठी दिलेल्या पाठिंब्याबाबत आम्हाला आनंद होत आहे. क्रीडा स्पर्धा आणि टाटा समीह यांचा समृद्ध वारसा आहे. त्यांच्या सततच्या सहभागाबद्दल आणि या प्रवासाचा एक भाग राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.