आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता कार जिंकण्याची संधी आहे. टाटा मोटर्स कंपनीने ही संधी दिली आहे. टाटा मोटर्स आपली नवी कोरी टाटा नेक्सन कार विजेत्या प्रेक्षकाला भेट देणार आहेत.
येत्या ७ एप्रिलपासून २०१८ची आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत प्रेक्षकांना या टाटा मोटर्सच्या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
पुढील तीन वर्षांसाठी टाटाने आयपीएलशी ऑफिशिएल पार्टनर म्हणून करार केला आहे. आयपीएल सामन्यादरम्यान टाटा आपल्या नेक्सन कारचं प्रमोशन करणार आहे.
टाटा मोटर्स याकडे संधी म्हणून पाहात आहे, त्यामुळे त्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये बक्षीसं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेक्षकांना जशी कार जिंकण्याची संधी आहे तशीच संधी आयपीएल संघांमधील खेळाडूंनाही असणार आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हीच टाटा नेक्सन कार इनाम म्हणून दिली जाणार आहे. प्रेक्षकांनाही हीच कार जिंकण्याची संधी आहे.
कशी जिंकाल टाटा नेक्सन कार???
-टाटा नेक्सन फॅन कॅच स्पर्धा असं या स्पर्धेचं नाव आहे, ज्यात प्रेक्षकांना भाग घ्यावा लागेल.
-घरबसल्या आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांना कार जिंकण्यांची संधी नाही. त्यामुळे तुम्ही घरबसल्या कार जिंकण्याचं स्वप्न पाहात असेल तर तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.
-ज्यांना टाटाची ही कार जिंकायची आहे त्यांनी मैदानात असणं गरजेचं आह, कारण तिकीट काढून मैदानात सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनाच ही संधी आहे.
-सामन्यादरम्यान प्रेक्षकांमधील जो कोणी एका हातात कॅच पकडेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे, मात्र कार जिंकण्यासाठी फक्त एवढंच पुरेसं नाही.
-संपूर्ण आयपीएल सीझनमध्ये जो प्रेक्षक सर्वाधिक वेळा अशाप्रकारे म्हणजे एका हातात कॅच पकडेल त्यालाच टाटा नेक्सन कार दिली जाणार आहे.